*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति – भाग १९*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण व्यास स्मृतिचा विचार करणार आहोत . तत्पूर्वी पुन्हा आठवण करुन देतो ती ही की महाभारत हे व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहिले . व्यासांची विनंती गणपतीने एका अटीवर मान्य केली ! ती अट ” मी अखंड लिहीन , आपण जिथे थांबाल तिथे मी थांबेन व पुन्हा लिहीणार नाही ! ” . त्यावर व्यासांनीही अट टाकली , ” मी जे सांगेन , ते समजल्याशिवाय पुढे लिहायचे नाही !” काय हा खेळ ! खरंच काही समजत नाही ! पण मनाला एक प्रश्न सहज पडतो , ” गणपती ही बुद्धीची देवता आणि तिला अट टाकणारे व्यास महर्षि !! ” काय बुद्धिमत्ता असेल व्यासांची ? अहो , आमचे आजोबा एका जेवणात जेवढं अन्न खायचे तेवढं आपण तीन वेळेस पुरवून खातो , ही आमची जाठराग्निची शक्ति !! पूर्वी सव्वा क्विंटलचे पोत्याला बसून पाठ लावून उचलणारी माणसं आम्ही बघितली ! आज कुणाची शारिरीक शक्ति नाही शंभर नंबरी लोखंड्या खांद्यावर टाकून शेतात नेण्याची ! बुद्धीची ताकद एवढी की परवा काय खाल्ले ? हे आठवत नाही गाढवांना ! आणि आम्ही टीका करतो स्मृतिकारांवर !!!! म्हणतो कसे ? ” अहो , जग कुठं चाललंय ! यानं ( रॉकेटस् ) सगळे ग्रह फिरतंय आणि मंगळावर पाणी शोधतंय , आपण कशाला चर्चा करताय स्मृतिंची ? काय मिळते त्यानं ?? खरं आहे ! ग्रहदशा फिरली की असंच बोलतात माणसं !!! मग हळूच एखादा कोरोना व्हायरस येतो व सगळे गोडवे गातात — अहो ! अमक्या स्मृतित असं म्हटलंय बरं का , तुम्हाला नव्हतं माहित ? अरेच्या !!!😂😂😂 असं बोलायला लागतात जसं याच्या बापाची इस्टेट आहे !!! चुकलो , चुकलो ! स्मृति ही बापाचीच इस्टेट ! फक्त सांभाळली परधर्मियांनी व आम्ही आज ही वैचारिक गुलाम म्हणून जगत आहोत ! आमच्या संस्कृतीला आमचा विरोध ज्या दिवशी संपेल तो खरा आमचा *स्वातंत्र्यदिन* ! भोगवादाकडे झुकलेली बुद्धिमत्ता जन्मदात्या आईवडिलांचेच हाल करत असेल तर संस्कृति वा भारतमातेची काय कथा ?? ” पशुत्व सारे हनन करु या , यज्ञशिखांचे तेज पिवू या ” या विचारधारेचे धनी गाढवं थोडीच होतात !!
मी बारावीत असतांना वडिलांनी ययाती वाच म्हणून सांगितले . आणि म्हणाले , ” ययाती हा प्रचंड भोगवादी . स्वतःचे भोग पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या मुलाकडून दहा वर्षे आयुष्य उसने घेतले . ” म्हणजे त्याने नेमके काय केले ? हा मला १९७८ साली बारावीत पडलेला प्रश्न . २०१३ साली वडिल नाशिकच्या मुंबई नाक्यावरील शताब्दी हाॅस्पिटलमधे सुश्रुषेसाठी दाखल झाले . मी जवळच होतो . पेरिटोनिअल डायलिसीसचा निर्णय झाला . डायालिसिस सुरु झाले . तब्बेत खालावली . वडिलांना घरी आणले . चार दिवसांनी वडिल कैलासवासी झाले . रात्री बारा बाजता डोक्यात लख्ख प्रकाश पडल्या सारखे झाले . आपण जर वडिलांना किडनी दिली असती तर ते सहज दहा वर्ष जगले असते !!??!! ( कारण माझे सासरे एका किडनीवर दहा वर्ष जगल्याचं माझ्या नजरेसमोरच होतं ! ) मी हैराण झालो विचाराने . थोड्या वेळाने विचार ययातीजवळ येवून थांबला . त्याने अशीच तर उसनी घेतली नसावीत दहा वर्षे !!! कोडं सुटल्याचा आनंद व वडिल गमावल्याचं दुःखं ! अशात रात्र सरली .असो . सांगायचं एवढंच की आपल्या पूर्वजांनी जे सांकेतिक भाषेत लिहून ठेवले , तेवढे तर ओळखा ? फक्त चरणं हा जनावरांचा धर्म आहे हो ! आपला वेगळेपणा कसा असावा ? विचार तर करा थोडासा ! टीव्हीवर संस्कृतिविरोधी व भारत विरोधी वक्तव्ये ऐकली व पाहिली की लाज वाटते आमच्या सरकारी यंत्रणेची ! असो , आज थांबतो .
विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*संवाद मिडिया*
*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵
*Advt Link👇*
————————————————–
📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢
🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯
घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊
*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶
🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰
👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*
👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*
😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇
▪️इरकली कॉटन साडी
▪️इरकली सिल्क साडी
▪️मधुराई कॉटन साडी
▪️खादी कॉटन साडी
▪️धारवाड साडी
▪️मधुराई सिल्क साडी
▪️सेमी पैठणी साडी
▪️खादी सिल्क साडी
▪️खादी वर्क ड्रेस
▪️पटोला ड्रेस
▪️टॉप पीस
▪️गाऊन
▪️सोलापूर चादर
▪️बेडशीट
▪️नॅपकिन
▪️सतरंजी
▪️पंचा
▪️वूलन चादर
▪️टॉवेल
▪️दिवाणसेट
▪️प्रिंटेड बेडशीट
▪️पिलो कव्हर
▪️लुंगी
▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट
▪️कुर्ता
▪️बंडी
💁🏻♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️
📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻
प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶♂️🚶🏻♀️
स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी
📱संपर्क : 9325329105 / 9860890774
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*