सावंतवाडी येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा बहूउददेशीय हॉल भाडे तत्वावर उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी विश्रामगृह व मुलांचे वसतीगृह सावंतवाडी लगत बांधलेला बहूउददेशीय हॉल भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती सहा. सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी उमेश आईर यांनी दिली आहे.
सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जिल्ह्यातील माजी सैनिक/ सेवारत सैनिक व त्यांचा परीवार तसेच सर्वसामान्य नागरीकांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी (लग्न, मूंज, वाढदिवस,साखरपुडा, सार्वजनिक सभा, शासकीय कार्यक्रम, स्नेह संमेलन व सांस्कृतीक कार्यक्रम)साठी उपलब्ध करुन देण्यात येईल.
या हॉलचे भाडे खूप माफक असल्याने सर्व सैनिकांना व सर्वसामान्य नागरीकांना याचा फायदा होणार आहे. या हॉलचे भाड्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. माजी सैनिक/ सेवारत सैनिक/ माजी सैनिक पत्नी यांच्यासाठी भाडे शुल्क 3000/- अधिक विद्युत भार (प्रती दिन). इतर नागरीकसाठी 5000/- अधिक विद्युत भार (प्रती दिन).
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228820/9422062820 वर संपर्क करावा. सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्याव, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.