*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग १८*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण *पराशर* स्मृतिमधील अजून काही श्लोक पाहू .
*मातरं यदि गच्छेत भगिनीं पुत्रिकांस्तथा ।*
*एतास्तु मोहितो गत्वा त्रीन् कृच्छ्रांस्तु समाचरेत् ॥*
*चान्द्रायणत्रयं कुर्य्याच्छिश्नच्छेदेन शुध्यति ।*
*मातृष्वसृगमे चैव आत्ममेढ्रनिकृन्तनम् ॥*
जर माता , भगिनी वा पुत्री ( मुलगी ) यांचेशी मोहित होवून संबंध केला तर तो तीन कृच्छ्र , तीन चान्द्रायण ( हे प्रायश्चित्ताचे प्रकार आहेत . ) ही प्रायश्चित्ते घेवून आपले स्वतःचे लिंग कापून शुद्ध होतो . मावशीशी संबंध केल्यावर आपले लिंग कापूनच शुद्ध होतो .
खरंच , परखड श्लोकाबद्दल पराशरांना नमस्कारच ! कसा घडवला असेल समाज माझ्या ऋषिंनी ? काय कष्ट पडले असतील ? कसा घडवला असेल भारत ? समाजातील सर्वच स्त्रिया ज्या देशात माता भगिनी समजल्या जातात त्या देशात स्त्रीवर होणार्या अत्याचारास अध्यात्म वा साधुसंतांची शिकवण जबाबदार आहे का अर्थप्रधान पोटार्थी शिक्षण , विज्ञानवादाचा अतिरेक व अशक्त लोकशाहीतील लुळापांगळा कायदा जबाबदार आहे ? हे पुन्हा सर्व समाजातील सकारात्मक विचारवंतांनी एकत्र येवून विचार करण्याची वेळ आली आहे ! आता पुढील श्लोक पहा .
*डामरे समरे वापि दुर्भिक्षे वा जनक्षये ।*
*बन्दिग्राहे भयार्ते वा सदा स्वस्त्रीं निरिक्षयेत् ॥*
विप्लवात वा दुःखात , युद्धाच्यावेळेस , दुष्काळात , जनसंहाराचेवेळी , बन्दी झाल्यावर , भीतीचे वातावरणात वा आतंककाळी नेहेमी आपल्या स्त्रीची रक्षा करावी .
किती सुंदर संदेश दिला पराशर ऋषिंनी ! नमस्कारच . स्त्रीचे संरक्षणाबाबतीत येवढी काळजी घेवूनसुद्धा भारतातील स्त्री स्मृति वाचत नाही वा मानत नाही वा त्यावर विरोधी वक्तव्य करत असतील तर वाईट ऋषि का स्त्रियां ! ठरवावे त्यांनीच !
*गृहस्थस्तु दयायुक्तो धर्ममेवानुचिन्तयेत् ।*
*पोष्यवर्गार्थसिद्ध्यर्थं न्यायवर्ती सुबुद्धिमान् ॥*
दयायुक्त , धर्माचरण करणारा , उत्तम बुद्धिवाल्या गृहस्थाने पोष्यवर्गासाठी ( त्यावर अवलंबून असणार्या ) वा त्यांच्या सिद्धिसाठी म्हणजे उत्कर्षासाठी धर्माचे नित्य चिंतन करावे .
इथे गृहस्थ हा शब्द सर्व वर्णातील म्हणजे ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र या चारही वर्णासाठी आहे . आज कोरोना वायरसमुळे स्वच्छता , शुद्धता , कोरोना वाॅरियर्स ( योद्धा म्हणजे क्षत्रियच आला ना ! ) या सर्व गोष्टी पाळताहेत सगळे ! आणि ब्राह्मणत्व व शूद्रत्व यात कुणीही हलकाभारी वा लहानथोर वा श्रेष्ठकनिष्ठ नसतोच ! हे पण जर कुणाला शिकता आलं नाही तर तो भारतीय मूर्ख वा पशुतुल्य नाही का ? आमचे भारतीय पोलीस संरक्षण कार्यासह सेवा ही करत आहेत ! याचा सरळ अर्थ ते क्षात्रतेजासह आम्ही भारतीयांनी विकृतार्थ लावलेल्या शूद्र शब्दाचे उन्नतिकरणही करत आहेत ! वैद्यकीय कर्मचारी ( वैद्य , परिचारक वा परिचारिका इ. सर्व ) सेवा भावाने कार्यरत आहेत , पत्रकार बांधव हे कानाकोपर्यात जावून सर्व प्रकारच्या बातम्या समाजास पुरवण्याचा सेवाभावी वसा जपत आहेत ! सर्व सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून स्वच्छता करत असतील तर ते नमस्कारार्ह नाहीत ? मग सेवा हे जर शूद्रकर्म स्मृतिंनी सांगितलं असेल तर माझ्यानजरेत पोलिस , वैद्यकीय कर्मचारी , पत्रकार आणि सफाई कर्मचारी हे ब्राह्मणाएवढेच श्रेष्ठ वा समानच आहेत ! माझा सर्वांनाच नमस्कार .🙏🙏 मग आता तुम्ही स्मृतिंनी चार वर्णयुक्त समाजरचना केली , ती बरोबर का चूक हे सांगा !!!!!!! आम्ही व्यवस्था निर्माण करतो व ज्यांना संस्कृति उद्ध्वस्त करायची आहे , ते भेद पाडतात ! माझ्या संस्कृतीत जे ऋषिवारसा वा ऋषिपरंपरा जपणारे साधु , संत आणि सर्व जातीतील माणसे मला श्रेष्ठच वाटतात . पण अशांच्या हत्या काळीज विदीर्ण करतात . निद्रीस्त समाज पाहिला की मन पिळले जाते . अस्तु .
*दक्षिणार्थं तु यो विप्रः शूद्रस्य जुहुयाद्धविः ।*
*ब्राह्मणस्तु भवेद्शूद्रः शूद्रस्तु ब्राह्मणो भवेत् ॥*
दक्षिणेसाठी जो ब्राह्मण शूद्राकडे होम करतो , तेंव्हा ब्राह्मण शूद्र होतो व शूद्र ब्राह्मण होतो .
आम्हाला चारही वर्णांच्या व्याख्या पूर्णांशाने अजून समजल्या नाहीत . मी स्वतः वा बरेच विचारवंत चारही वर्ण एकाच पातळीवर मानतात— तोलतात वा जे म्हणायचे ते म्हणा , पण माणूस म्हणून सर्वांना समान समजणारी माणसे इथे आहेत . संसदेतले आचार , शल्यगृहातील नियम , एखाद्या आॅफिसमधील वागायच्या पद्धती , न्यायालयातील नीतिनियम , मंदिरातील आचरण पद्धती , स्वयंपाकघरातील रिवाज , अधिकारी माणसाने अधिकारी माणसाला वा शिपायाने अधिकारी वर्गाला भेटण्या बोलण्याचे वा एकमेकांसमोर वागण्याचे शिष्टाचार हे जसे वेगवेगळे असतात , तसेच चारही वर्णांनी काय करावे ? कसे वागावे ? हे ऋषिंनी ठरवून दिले व त्या व्यवस्थेला वर्णाश्रम पद्धती वा व्यवस्था हे नाव दिले ! येवढेच . आजही एकाच समाजातील एका घरातील माणसे त्याच समाजातील प्रत्येक घरी जातातच असे नाही ! पाणी पिणे वा खाणे करतातच असे नाही ! हे सर्व जातीत व सर्व धर्मात समान आहेच ! हे अनुभवाचे बोल आहेत . पण मग कुणी डिवचले तर आम्ही का उद्ध्वस्त व्हावे ! सदर श्लोकातील शूद्रत्व म्हणजे १) अस्वच्छ , २) अशुद्ध , ३) अपवित्र , ४) अमंगल ,५)क्रूर , ६) अभद्र , ७) पाशवी , ८) राक्षसी , ९)नीच १०)अयोग्य विचार करणारी , उच्चार करणारी वा कर्म करणारी माणसे व निषिद्ध पेयपान आणि अन्नसेवन करणारी माणसे , मी समजतो . बाकी जन्माला येणार्या जगातील प्रत्येकास ब्राह्मण होण्याचा अधिकार माझे संस्कृतीने कधीच दिलाय ! ते ही ऋषिविचार मी सविस्तर देईनच ! माझे ऋषि योग्य सांगतात , यावर माझा विश्वास आहे . बाकी प्रश्न हा वैयक्तिक आहे . फक्त सांगणे एकच , आम्ही जिथे जन्मलो त्या संस्कृतीमधील आमचे पूर्वज ऋषिंना कालबाह्य ठरवू नका . त्यांनी नेमलेल्या व्यवस्थेनेच इतकी वर्षे आर्थिक , सामाजिक , धार्मिक , बौद्धिक , कामुक आणि अनैतिक आक्रमणे होवूनसुद्धा आम्ही भारतीय वा हिंदू म्हणून आजही ताठ मानेने जगत आहोत !! हे न समजाल तर तुम्ही संपलाच म्हणून समजा !! काळ कुणालाही क्षमा करत नाही ! हे जाणा व एक व्हा .
अशातच ह्या पराशर स्मृतित रामेश्वर येथील सेतुबंधाचा म्हणजे रामाने सांगितल्यावर नलाने तो बांधल्याचा उल्लेख येतो . तिथे जावून पापाची कबूली दिल्यावर माणूस पापमुक्त होतो , असे वर्णन आहे . तसे ऐतिहासिक उल्लेखासाठीही वा दाखल्यासाठीही ही स्मृति वाचावीच !
विनंती इतकीच , पराशर स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ? आणि हो , *वाचाल तरच वाचाल*🙏🙏 उद्या व्यास स्मृति पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*संवाद मिडिया*
*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵
*Advt Link👇*
————————————————–
📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢
🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯
घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊
*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶
🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰
👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*
👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*
😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇
▪️इरकली कॉटन साडी
▪️इरकली सिल्क साडी
▪️मधुराई कॉटन साडी
▪️खादी कॉटन साडी
▪️धारवाड साडी
▪️मधुराई सिल्क साडी
▪️सेमी पैठणी साडी
▪️खादी सिल्क साडी
▪️खादी वर्क ड्रेस
▪️पटोला ड्रेस
▪️टॉप पीस
▪️गाऊन
▪️सोलापूर चादर
▪️बेडशीट
▪️नॅपकिन
▪️सतरंजी
▪️पंचा
▪️वूलन चादर
▪️टॉवेल
▪️दिवाणसेट
▪️प्रिंटेड बेडशीट
▪️पिलो कव्हर
▪️लुंगी
▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट
▪️कुर्ता
▪️बंडी
💁🏻♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️
📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻
प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶♂️🚶🏻♀️
स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी
📱संपर्क : 9325329105 / 9860890774
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*