थोर समाज सेवक आणि ज्यांनी आपले सर्व आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेत आणि पुनर्वसन करण्यात घालवले ते मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांच्या पत्नी साधना ताई आमटे…
५ मे १९२६ साली इंदू चा जन्म नागपूर येथे महामहोपाध्याय घुले शाश्त्रीं च्या कर्मठ घरात झाला. इंदुच्या वडीलांचे अकाली निधन झाले.आणि इंदूने न डगमगता आईच्या बरोबरीने घराची जबाबदारी स्वीकारली.
पुढे महाविद्यालयीन शिक्षण इंटर पर्यंत झाले आणि बाबा आमटेंच्या प्रेमात त्या पडल्या. ८ डिसेंबर १९४६ मधे त्या विवाह बध्द झाल्या.
बाबा आमटे या सन्याशी माणसाशी विवाह हा घरच्यांचा विरोधात जाऊन केला.
कुष्ठरोग्यांना बरोबर घेऊन बाबां बऱोबर माळरानावर आपल्या संसाराची सुरुवात मोठ्या आनंदाने केली.
प्रत्येक कामात त्या बाबाना मदत करु लागल्या.जाचक सामाजिक रुढी आणि परंपरा च्या चौकटीत राहूनही त्या परंपरा मोडून काढण्यासाठी झटत होत्या. हरिजन लोकांना नळाला हात लावण्याची परवानगी नव्हती.त्या वेळी त्याना विहिरी वरून पाणी काढून देत असत.अशा रितीने त्या सर्वांना परिचित झाल्या आणि इंदुच्या साधना ताई त झाल्या.
प्रत्येक कामात त्या बाबाना मदत करीत असत. हे सर्व करित असताना कोणताही अहंकार त्यात नव्हता.सेवेच्या कामात आत्मियता आणून संस्थाना कुटुंबाचा चेहरा नव्हे तर प्रक्रुति प्राप्त करून देणार्या संस्काराच्या त्या प्रतिनिधी होत्या.
बाबानी कामे उभारायची आणि साधना ताईनी त्यांच्या विधायक प्रव्रुत्तीत प्रसन्न आपलेपणा आणायचा.अशी त्यांची श्रमविभागणी होती.
१५ आँगस्ट १९४९ साली बाबा आणि साधना ताईनी गडचिरोलीत आनंदवन येथे एका झाडा खाली कुष्ठरोग्यां साठी एक हाँस्पिटल सुरू केले….. बाबा आमटे डॉक्टर नव्हते तर ते वकील होते. काही काळ त्यानी वकीली पण केली होती. ज्यावेळी त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचा निर्णय घेतला .त्या वेळी त्यांनी पंडित नेहरूंच्या शिफारशी ने कुष्ठरोग संबंधी एक कोर्स केला. आणि नंतर त्यानी ही सेवा सुरु केली.
त्यांची दोन अपत्ये म्हणजे डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विकास.. प्रकाश यांची पत्नी डॉ.मंदाकिनी,व डॉक्टर विकास यांच्या पत्नी डॉक्टर भारती या सर्वांनी या कामात झोकून दिले.
१९७३ मधे गडचिरोली मधे ,”लोकबिरादरी ” प्रकल्प गोंड आणि माडीया अदिवासीं करिता एक हाँस्पिटल आणि एक शाळा सुरू करण्यात आली.तेथे डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी काम पाहू लागले.आणि आनंदवन मधे डॉ विकास व त्यांची पत्नी डॉ भारती हे काम पाहु लागले.
कामाची व्याप्ती खूपच वाढवली होती. कुष्ठरोगीं बरोबर, अंध, अपंग, अदिवासींचे आरोग्य, शिक्षण , कुष्ठरोगींचे पुनर्वसन.अशी अनेक विधायक कामे त्यानी सुरू केली. जंगली श्वापदे यांचीही देखभाल ते करू लागले.जंगलात वाघ,सिंह असे प्राणी जखमी अवस्थेत सापडत. त्याना आणुन त्यांच्यावर ते उपचार करू लागले.
साधना ताई आणि बाबा यानी कुष्ठरोग हा संसर्गजन्य नाही हा प्रचार केला. आयुष्य भर त्यानी हा ,संदेश लोकां पर्यंत पोचविण्याचे काम केले. बाबा आमटे यांचे निधन ९ फेब्रुवारी २००८ मधे वयाच्या ९३ व्या वर्षी झाले. साधना ताईनी खंबीरपणे सर्व धुरा सांभाळली. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक महिला. असते हे साधना ताईनी करून दाखवले होते.
आनंदवन मधे ५००० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले….कुष्ठरोग झाला की, घरातील लोक त्याना घरात घेत नाहीत समाजात लोक त्याना आपलेसे करत नाहीत अशा परिस्थितीत बरे झालेल्या माणसाना, त्यांची लग्न लावून देणे, घर बांधून देणे, उपजिविके साठी व्यवसाय उपलब्ध करून देणे. एवढे मोठे साम्राज्य बाबा आणि साधना ताई यानी उभारले.
साधना ताईंच्या या निरालस कार्याची दखल अनेक सामाजिक संस्थानी घेतली. त्याना पुढील प्रमाणे पुरस्कार प्राप्त झाले.
महाराष्ट्रशासनाचा दलित मित्र पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, ग्रुहिणी सखी सचिव पुरस्कार, मिनाताई ठाकरे ट्रस्टचा मातोश्री पुरस्कार,जय ताई मात्रु गौरव पुरस्कार. तुळजाई स्त्री शक्ती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारानी साधना ताईना गौरविण्यात आले
अशा या महान ,आदर्श.
महिला साधना ताईनी ९ जुलै २०११ मधे आनंदवन मधे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्य कार्याला मानाचा मुजरा…
कल्पना तेंडुलकर
ओरोस सिंधुदुर्ग