You are currently viewing बोलाकं आणि फुलाकं गाठ”…..

बोलाकं आणि फुलाकं गाठ”…..

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

..दोन दिवसापूर्वीच दुबईतील माझ्या एका जगभ्रमंती करणाऱ्या मैत्रीणीने फोन केला.ती परदेशवाऱ्या करत असली तर कोकणातीलच असल्याने अस्सल मालवणीतचं बोलते.मला म्हणाली”पार्सेकरानो,त्या तुमच्या चिपीच्या विमानतळावरसून विमाना कधी उडतली?तुम्ही तुमच्या प्रभूसाहेबांका सांगा महो,कायतरी करा म्हणाचा”…मी तिला ..होय होय स़ागतय असं म्हणालो.
जेव्हा मा.प्रभूसाहेब केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री होते तेव्हा खऱ्या अर्थाने या कामाला गती मिळाली होती.दोन वर्षापूर्वी झालेल्या उदघाटन सोहळ्यात जनशिक्षणच्या सायकल वाटपाचा कार्यक्रम असल्याने मलाही त्या सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सहभागी होता आल होत..उदघाटन सोहळ्यानंतर काही दिवसांनी विमानसेवा सुरु होईल अशी प्रत्येक कोकणवासीयांची अपेक्षा आणि इच्छा होती…पण आपल्या दुर्दैवाने केंद्रात फक्त कोकणसाठीचं नव्हे तर अवघ्या भारतवर्षासाठी सर्व स्तरावर काम करणारे मा.सुरेशजी प्रभू मंत्री झाले नाहीत.. आणि महाराष्ट्रातही अनपेक्षितपणे आघाडीचे सरकार आले…कारण कोणतही असो पण काम रखडलं जातय हे जेव्हा मा.प्रभूंच्या लक्षात आल तेव्हा त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला.मला गेल्या काही वर्षात अशा अनेक गोष्टी माहीत आहेत..कामं करतात प्रभू आणि श्रेय उपटतात भलतेच..पण मा.प्रभू साहेबांनी कधी ना श्रेयासाठी काम केला ना त्याचा डंका पिटला.
साहेबांनी कालच मला हाँटस्पँपवर मेसेज पाठवला कि,मा.केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री हरदिपसिंग यांनी साहेबांना लेखी आश्वासन दिलेल आहे कि,जानेवारी२०२१ अखेरीस ही बहुचर्चित विमानसेवा सुरु होईल. अर्थात साहेबांच्या स्वभावानुसार ते या लेखी आश्वासनवर न थांबता आपलं कौशल्य आणि दिल्ली दरबारी असलेला दबदबा यावर निश्चितच प्रश्न मार्गी लावतील.
मी माझ्या मैत्रीणला कळवलं कि तू कालच याबाबत बोललीस आणि आज याबाबतची घडामोड कळली.याला मालवणीत म्हणतात,”बोलाकं आणि फुलाकं गाठ”..अर्थात योगायोग…
अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा