You are currently viewing सव्वा लाख पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट – मालवण बंदर निरीक्षक अनंत गोसावी 

सव्वा लाख पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट – मालवण बंदर निरीक्षक अनंत गोसावी 

सव्वा लाख पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट – मालवण बंदर निरीक्षक अनंत गोसावी

मालवण

पर्यटन हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर अखेर पर्यत सुमारे सव्वा लाख पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली आहे. यापैकी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 62 हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग दर्शन केले आहे. अशी माहिती मालवण बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाची सागरी राजधानी म्हणून मालवणची ओळख आहे. येथील अरबी समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती असते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन दरम्यान मालवण बंदर जेटीवरून किल्ले सिंधुदुर्ग पर्यंत प्रवासी होडीतील प्रवास विशेष आकर्षण ठरतो. पावसाळी कालावधी वगळता 1 सप्टेंबर ते 25 मे हा पर्यटन हंगाम काळात किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी सेवा सुरु असते.

या पर्यटन हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आतापर्यंत 1 लाख 22 हजार 545 पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. यात सप्टेंबर महिन्यात काही पावसाळी कालावधी असल्याने केवळ 3988 पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग भेट दिली. ओक्टोम्बर महिन्यात 9962 पर्यटकांनी भेट दिली. नोव्हेंबर महिन्यात 45829 पर्यटकांनी भेट दिली. तर डिसेंबर महिन्यात 62766 पर्यटकांनी भेट दिली आहे. सहली तसेच पर्यटन हंगाम याचा विचार करता पर्यटकांची संख्या आगामी काळात निश्चितच वाढणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 12 =