स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शालेय क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा :
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शालेय क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सावंतवाडीचे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांचे शालेय शिक्षण नवोदय विद्यालय कागल येथे झाले. त्यांनी या संस्थेद्वारे आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ रिले मध्ये तिसरे पारितोषिक प्राप्त केले. तर कृषी विद्यापीठाद्वारे आयोजित केलेल्या खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली. तसेच, कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे श्री. श्रीधर पाटील,शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत, शालेय क्रीडा शिक्षक श्री. हमीद शेख व श्री. समद शेख, कराटे शिक्षक श्री दिनेश जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास सुरुवात करताना प्रत्येक हाऊसच्या कप्तान व उपकप्तान यांनी माशालदौड केली. सर्व हाऊसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तीत संचालन केले. त्यानंतर, शाळेत उपस्थित प्रमुख पाहुणे श्री. श्रीधर पाटील यांनी आपले स्वानुभव व्यक्त केले. यामध्ये त्यांनी विविध खेळांमुळे स्वयंशिस्त , संयम व खिलाडूवृत्ती विद्यार्थ्यांना अवगत करता येते व या गोष्टींची शिदोरी जन्मभरासाठी पुरते असे त्यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना त्यांनी विविध खेळ, स्पर्धा यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच, विद्यार्थ्यांना शाळेत इयत्ता १ली पासूनच खेळाची ओळख व खेळ खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीशा कामत व संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेकरीता प्रोत्साहन दिले. इयत्ता १ली व २री च्या विद्यार्थ्यांनी पी.टी. ड्रिल , इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिड तर इयत्ता ३ री, ४ थी व ५ वी च्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच, कराटे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा कराटे प्रात्यक्षिक घेतले गेले व त्यामधील विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन सन्मानित केले गेले. त्याचप्रमाणे, प्रत्येक हाऊसच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या १०० व २०० मीटर धावण्याची स्पर्धा, भालाफेक, थालीफेक, चेंडूफेक, गोळाफेक या स्पर्धा घेण्यात आल्या व प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रौप्य पदक व कांस्य पदक त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे, हँडबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी ‘ वायू हाऊस ‘ या गटातील विद्यार्थ्यांना व द्वितीय क्रमांकाने विजयी ‘ पृथ्वी हाऊस’ या गटातील विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले गेले. तर, हॉकी या खेळामध्ये प्रथम क्रमांकाने विजयी ‘ पृथ्वी हाऊस ‘ या गटातील विद्यार्थिनींना व द्वितीय क्रमांकाने विजयी ‘ जल हाऊस ‘ या गटातील विद्यार्थिनींना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे वर्षभरात घेतल्या गेलेल्या स्पर्धांचा गुणांक आणि वरील क्रीडास्पर्धांमध्ये मिळालेल्या गुणांकानुसार ‘ वायू हाऊस ‘ प्रथम क्रमांकाने स्थानापन्न झाला. तर क्रमांकाने ‘ पृथ्वी हाऊस ‘ विजयी झाला. या दोन्ही हाऊसच्या गटातील विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले गेले. तसेच ‘ जल हाऊस ‘ या गटाने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांप्रमाणे, पालकांनी देखील चमचा लिंबू व बुक बॅलेंसिंग या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, पालकांना देखील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव व सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय सहा. शिक्षिका सौ. श्रावणी वैद्य व सहा.शिक्षक श्री. कपिल कांबळे यांनी केले. वरील कार्यक्रमासाठी शालेय सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी या सर्वांनी उत्तम पाठिंबा दिला व आनंदाने क्रीडा स्पर्धेचा सोहळा पार पाडला. तसेच शाळेचे संचालक श्री रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले. प्रकारे सेटिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मेरा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.