You are currently viewing शिक्षकेतर कर्मचारी हद्दपार करणा-या शासन अध्यादेशाचा” दोडामार्ग तालुक्यात होळी करत केला निषेध.

शिक्षकेतर कर्मचारी हद्दपार करणा-या शासन अध्यादेशाचा” दोडामार्ग तालुक्यात होळी करत केला निषेध.

दोडामार्ग
राज्यातील शाळेत सर्व शिक्षकेत्तरची नोकर भरती शासनाने कायमची बंद केली असून यापुढे फक्त पाच हजार इतक्या मानधन तत्वावर कंत्राटी शिपाई नेमणार असल्याचा शासन निर्णय शुक्रवारी ११डिसेंबर रोजी शिक्षण विभागाने घेतला आहे.याचे सर्व स्तरातून पडसाद उमटू लागले असुन आज दोडामार्ग तालुक्यात शासनाच्या या अन्यायकारक शासन निर्णयाचा निषेध करीत या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पदाधिकारी यांनी क या शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.
अध्यादेशाची होळी करताना शिक्षक भारती जिल्हा प्रतिनिधी युवराज सावंत , शिक्षक भारती महिला आघाडी सचिव सौ.आडेलकर , दोडामार्ग शिक्षकेतर कर्मचारी संघटना सचिव विजय गवस , दोडामार्ग प्रयोगशाळा परिचर संघटना अध्यक्ष विष्णू लोंढे, मुख्याध्यापक श्र.एस.ए.कांबळे, अनिल ओतारी , के.एस. नाईक, भाऊसाहेब कृष्णा लोंढे , सुधाकर बांदेकर , विठ्ठल दळवी व शिक्षक भारती दोडामार्ग तालुका अध्यक्ष शरद देसाई. व सर्व शिलेदार.

प्रतिक्रिया व्यक्त करा