सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1जानेवारीपासून रेशन दुकान बंद आंदोलन –
रुपेश पेडणेकर
विविध प्रलंबित मागण्यांसाठी करणार आंदोलन.
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते महासंघामार्फत प्रलंबित विविध मागण्यांसाठी देशभरात 1 जानेवारी २०२४ पासून देशभरात न्यायमागणीसाठी बंद पुकारत असल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिली.
बंद बाबत दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की,आयुष्यमान भारत योजनेचे काम धान्य दुकानदार करणार नाहीत. दिवाळी शिधावाटप मोफत धान्य वाटप करणेसाठी दुकानात इंटरनेट सुविधा पूर्णतः मिळत नाही. तरी वरील योजनेचे काम करण्यास धान्य दुकानात इंटरनेट सुविधा व सदर सर्वरचे बंद होणे हे गेल्या महिन्यात दुकानदार व आरोग्य कर्मचारी यांनी दुकानात अनुभवले आहे. त्यामुळे विरोध आहे. शासनाने धान्य किंवा काही योजना शासनामार्फत धान्य दुकानदारांकडून राबविल्या जाऊ शकतात. त्यासाठी आवश्यक असणारी इंटरनेट सुविधा पुरविण्यात येत नाही. ऑगस्ट २०२३ पासून ते ऑक्टोबर २०२३ पर्यतचे कमिशन अद्याप मिळालेले नाही. याबाबत कार्यवाही होईपर्यंत रेशन दुकान बंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिली.