*व्यसनमुक्त राहू! इतरांना व्यसनमुक्त करू!*
गोपुरी परिवार आणि हितचिंतकांनी केला संकल्प
नशाबंदी मंडळ आणि गोपुरी आश्रम हितचिंतक साथीदारांनी वर्षात निर्व्यसनी राहून इतरांना निर्व्यसनी करण्याचा संकल्प गोपुरी आश्रमात कोकण गांधीआप्पासाहेबांच्या पुतळ्याजवळ केला!
जगभरात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात व्यसनांचा आधार घेतला जातो. याचा परिणाम या दिवशी नव्या वर्षाच्या जल्लोषात जे नव्याने व्यसनांचा आधार घेतात ते कायमस्वरूपी व्यसनात अडकतात. याचा विचार करून नशाबंदी मंडळ आणि गोपुरी आश्रम हितचिंतक साथीदारांनी हा विचार मोडीत काढून नवीन विधायक आनंददायी संकल्प करावे असा विचार या नव्या वर्षाच्या निमित्ताने पुढे आणला !
वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालून. मानवाला प्रगतीपथाकडे घेऊन जाणारे आनंदोत्सव साजरे करावेत, जे उत्सव विधायक आणि वैचारिक दृष्ट्या प्रगतिशील असतील असा विचार या हितचिंतकांच्या चर्चेतून मांडण्यात आला. या चर्चेत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ प्रा राजेंद्र मुंबरकर,कमलाकर निग्रो, प्रदीप मांजरेकर, सुजय जाधव, विशाल गुरव, विनायक साफळे, संदीप सावंत, मनोज सावंत, विनायक मिस्त्री, अमोल सावंत ,सदाशिव राणे अमोल भोगले अंकुश सावंत, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. शेवटी *आम्ही व्यसनमुक्त राहू! इतरांना व्यसनमुक्त करू*!*असा नव्या वर्षाचा संकल्प करून सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.