You are currently viewing मुंबईच्या आसमंतात झळकला “चांदतारा”

मुंबईच्या आसमंतात झळकला “चांदतारा”

*मुंबईच्या आसमंतात झळकला “चांदतारा”*

*६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘चांदतारा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच पोलीस कल्याण केंद्र, मुंबई या संस्थेच्या ‘एकेक पान गळावया’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज (२९ डिसेंबर) एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या ‘घायाळ’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक सुनिल कदम (एकेक पान गळावया), द्वितीय पारितोषिक रमाकांत जाधव (चांदतारा), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (चांदतारा), द्वितीय पारितोषिक विनोद राठोड (आर्यम), नेपथ्य: प्रथम पारितोषिक प्रदिप पाटील (चांदतारा), द्वितीय पारितोषिक कविता विभावरी (घायाळ), रंगभूषा प्रथम पारितोषिक उल्लेश खंदारे (घायाळ), द्वितीय पारितोषिक वैभव सावंत (चांदतारा), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुशिल इनामदार (एकेक पान गळावया) आणि वैदेही मुळे (घायाळ), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे डॉ. सोनल शिंदे (दिवान-ए-मख्फी), सृष्टी शेलार (अंगणातली रांगोळी), समृध्दी खडके (मन मनास उमगत नाही), तनिषा वर्दे (चल थोडं अॅडजस्ट करु), अदिती खानविलकर (आर्यम), भावेश टिटवळकर (चल थोडं अॅडजस्ट करु), सुशिल घाडगे (द आऊटबर्स्ट), सायली साळवी (द रेन इन द डार्क), रोहीत खरवडे (द आऊटबर्स्ट), रविंद्र गिरकर (देव चोरला माझा), सोमनाथ शिंदे (दिवान-ए-मख्फी).

दि. २१ नोव्हेंबर, २०२३ ते २८ डिसेंबर, २०२३ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वसंत सामदेकर, ईश्वर जगताप आणि प्राची गडकरी यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा