You are currently viewing मालवण येथील सैनिकी विश्रामगृह येथे तात्परत्या स्वरुपात कंत्राटी भरती

मालवण येथील सैनिकी विश्रामगृह येथे तात्परत्या स्वरुपात कंत्राटी भरती

मालवण येथील सैनिकी विश्रामगृह येथे तात्परत्या स्वरुपात कंत्राटी भरती

सिंधुदुर्गनगरी

  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या मालवण येथील सैनिकी विश्रामगृह, येथे तात्परत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने (Commercial Purpose) माजी सैनिक प्रवर्गातून अशासकीय पदे भरण्यासाठी, पात्र माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र आणि नागरी उमेवारांनी 2 फोटो, आधार कार्ड व बँक पासबुक या कागदपत्रांसह दि. 5 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज करण्याचे आहवान जिल्हा सैनिक  कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

           जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी विश्रामगृह, मालवणचे बांधकाम पुर्ण  झालेले असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील माजी सैनिक/ सेवारत सैनिक व त्यांच्या परीवार तसेच सामान्य नागरीक यांना एक राहण्याची उत्तम सोय करण्यात येत आहे.

           या विश्रामगृहाच्या व्यवस्थापनेकरीता (Commercial Purpose) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने एकंदरीत मानधनावर माजी सैनिकाचे एक पद भरावयाचे आहे. (उमेदवार हा सैन्य दलातून हवलदार/ नायब सुभेदार या पदावरुन निवृत्त झालेला असावा व संगणक हाताळण्याचे ज्ञान असावे.)अशासकीय सफाई कामगार हे 1 पद (माजी सैनिक) भरावयाचे आहे. माजी सैनिक प्रवर्गातून सफाई कामगार उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद हे  नागरी संवर्गातून भरण्यात येईल. अधिक माहितीसाठी (मानधन व कामाचे स्वरुप) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा