You are currently viewing मागील नऊ वर्षांतील ‘विकासाचा’ बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्नशील – भाजप नेते निलेश राणे 

मागील नऊ वर्षांतील ‘विकासाचा’ बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्नशील – भाजप नेते निलेश राणे 

मागील नऊ वर्षांतील ‘विकासाचा’ बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्नशील – भाजप नेते निलेश राणे

चिंदर भगवंतगड किल्ल्याची पहाणी..

मालवण

वर्षभरात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झाला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघासाठी झुकते माप देत करोडो रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. गेल्या नऊ वर्षांत हा मतदरसंघ विकास कामात मागे राहिला. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजूनही भरपूर प्रमाणात विकासनिधीची आवश्यकता आहे. या सरकारच्या माध्यमातून तोही पूर्ण करु असा विश्वास भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी भगवंतगड किल्ल्यावर व्यक्त केला.

माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी चिंदर भगवंतगड या चढण्यासाठी अवघड असलेल्या किल्ल्यावर भेट देत पहाणी केली यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालूकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, संतोष कोदे, संदीप परब, राजन गावकर, महेश मांजरेकर,
आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, चंदू कदम, दत्ता वराडकर, मंगेश गावकर, मनोज हडकर, संतोष गावकर, देवेंद्र हडकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री राणे यांनी किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिराची पडझड झाली आहे. लवकरात लवकर मंदिराची दुरुस्ती काम पूर्ण केले जाईल. येथील ऐतिहासिक व धार्मिक पवित्र्य जपून जे काही करणे शक्य आहे ते ते सर्वकाही करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निलेश राणे यांनी या निमित्ताने सांगितले.

यावेळी निलेश राणे यांनी सिद्धेश्वर मंदिर तसेच किल्ला परिसराची पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =