You are currently viewing खाकी वर्दीच्या आशीर्वादाने जत्रेत जुगार

खाकी वर्दीच्या आशीर्वादाने जत्रेत जुगार

*खाकी वर्दीच्या आशीर्वादाने जत्रेत जुगार*

*वांडर आणि खडपातील पप्या ठरवतात बैठक*

कणकवली येथील ऑनलाईन जुगारावर पोलिसांची झालेली कारवाई ताजी असतानाच जत्रोत्सवातील जुगार मात्र माघार घेताना दिसत नाहीत. खाकी वर्दीच्या आशीर्वादावरच जत्रोत्सवांमध्ये जुगारांना तेजी आलेली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील काही जत्रोत्सवात खाकी वर्दीच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर जुगाराच्या बैठका बसल्या आहेत.
वांडर आणि खडपातील पप्या हे दोघेजण खाकी वर्दीशी हात मिळवणी करून वेंगुर्ले तालुक्यातील जत्रोत्सवांमध्ये जुगाराच्या बैठका ठरवतात. ग्रामस्थांचा विरोध असेल तिथे काढता पाय घेतात. खाकी वर्दीचे हात ओले होत असल्याने त्या त्या भागातील खाकी वर्दीचे शिलेदार आपला हिस्सा घेऊन जुगार बैठकांना परवानगी देतात. त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असून त्याकडे खाकीवर्दीने पाठ केलेली दिसत आहे.
एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ऑनलाइन जुगारावर कणकवली येथे कारवाई होते आणि दुसरीकडे जत्रोत्सवांमधील जुगारांकडे पोलिसांचा दुर्लक्ष होतो.. हे नक्की काय गौडबंगाल आहे समजत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल जत्रोत्सवांमधील जुगारांकडे गंभीरपणे पाहणार का..? हाच प्रश्न प्रत्येकाच्या समोर उभा राहत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा