शहरातील परप्रांतीयांच्या नोंदी, अवैध धंदे, गोवा बनावटीची दारू विक्री प्रकरणी तीव्र स्वरूपाचे कारवाई करणे..
मनविसे जिल्हाधयक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी यांची मनसे शिष्टमंडळाने घेतली भेट
सावंतवाडी
सावंतवाडी उपविभागातील चार ही तालुक्यात सध्या परप्रांतीयांची संख्या वेगाने वाढत असून त्यां सर्वांच्या नोंदी पोलिस ठाण्यात ठेवण्यात याव्यात. याबाबत गांभीर्याने कार्यवाही केली जावी तसेच सावंतवाडी शहरात तालुक्यात अवैध धंदे वं राजरोसपणे गोवा बनावटीच्या दारूचा कारभार खुलेआम सुरु असून त्यावर ही तीव्र स्वरूपाची कारवाई केली जावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाधयक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांच्याकडें केली. यावर अधिकारी गावडे यांनी याबाबतच्या सूचना तातडीने पोलिस निरीक्षक यांना देण्यात येऊन योग्य ती ठोस कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांची भेट घेतली. यावेळी चार ही तालुक्यातील परप्रांतीय यांची वाढणारी संख्या लक्षात घेता त्यांच्या नोंदी पोलिस ठाण्यात ठेवल्या जाव्यात. बहुतांशी वेळी गुन्ह्यात परप्रांतीय यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे परंतु त्यांचा ठावठिकाणा कागदपत्रे नसल्याने त्यांना शोधणे मुश्किल होते. अशी बरीच प्रकरणे सध्या जिल्ह्यात होत आहेत त्यामुळे फिरते विक्रेते ठेकेदार यांच्याकडे येणारे परप्रांतीय कामगार यांच्या नोंदी ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली. सध्या नववर्षाच्या धामधूमीत बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची राजरोसपणे वाहतूक सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू चोरीछुप्या मार्गाने जिल्ह्यात दाखल होत असून सध्या जुगार, मटका,चरस गांजा या सारख्या अवैध धंद्याना ही ऊत आला आहे त्यामुळे ठोस कारवाई करून त्यावर निर्बंध आणण्यात यावेत याप्रश्नई मनसे पदाधिकारी स्वतः सहकार्य करतील असे आश्वासन दिले. शहरात रात्रीच्या वेळी धूम स्टाईलने गाड्या चालवल्या जातात भरधाव वेगात कार गाड्या हाकल्या जातं असून वेळ प्रसंगी अपघात होण्याची दाट शक्यता आहे अशा गाड्यावर कारवाई केली जावी. गावागावात नाक्या नाक्यावर गोवा दारू विकली जाते त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधिंन होण्याचे प्रमाण वाढत आहे अशा दारू अड्यावर कारवाई केली जावी अशी मागणी मनसे पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे यांनी या गंभीर मुद्द्यावर चर्चा करून पोलिस निरीक्षक यांना आदेश देऊन कारवाई केली जाईल. गावातील दारू अड्डयावर पोलिसांना पाठवून त्यां ठिकाणी कारवाई मोहीम हाती घेऊ. परप्रांतीयं यांच्या नोंदी प्रत्येक पोलिस ठाण्यात ठेवण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन अधिकारी गावडे यांनी दिले.यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी उपतालुका अध्यक्ष प्रकाश साटेलकर माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक माजी शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे विजय जांभळे विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी उपतालुका अध्यक्ष प्रणित तळकर विभाग अध्यक्ष विशाल बर्डे गिरगोल दिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.