गुरूचरित्राचे अखंड पारायण वाचण्याने जीवनाचा उत्कर्ष होईल –
प.पू. सद्गुरु गुरूदास माऊली सारंग महाराज यांचे प्रतिपादन
मुलुंड प्रतिनिधी
भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. गुरूचरित्राचे अखंड पारायण करून सतत वाचले गेले तर निश्चितच आपल्या जीवनात यशस्वी होता येते. पारायणाने अनुभव येत राहतात. परमेश्वराचे चिंतन केल्याशिवाय आपल्याला दुसरा आधार नाही. म्हणून नाम घ्यायला पाहिजे. आणि शेवटी, भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की, त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे. असे प्रशंसनीय गौरवोद्गार
प.पू. सद्गुरु गुरूदास माऊली सारंग महाराज यांनी श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ मुलुंड ( पूर्व) मुंबई येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्तजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त १३ व्या अध्यायाचे भक्तांना अध्ययन करताना काढले.
प्रारंभी प्रतिवर्षीप्रमाणे नित्य पूजेने प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री सत्यनारायण महापूजेचे मानकरी म्हणून जेष्ठ सभासद शंकर गोविंद सावंत या दांपत्याला देण्यात आला होता. पुरोहित अमोल माईणकर यांनी पूरोहित्य केले.
सद्गुरु गुरूदास माऊली पुढे म्हणाल्या की,आज राऊळ महाराजांनी समाधी घेतल्यावर पंचवीस वर्षे होऊन गेली. दत्तमूत्ती देताना ही तीन पोरा घे आणि सांभाळ कर ! असे सांगितले. आजपर्यंतचा विक्रोळी ते मुलुंड असा हा प्रवास असून हे चाळीसावे वर्षे आहे . आपण सर्वांनी नित्यनेमाने नामस्मरण करा. म्हणजे जीवन व्यतीत करताना लाभ आपल्या सर्वांना मिळून सुख शांती लाभेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा महत्त्वाची आहे. असे उपस्थित भक्तांना प्रबोधन करताना सांगितले.
याप्रसंगी दत्त जन्मोत्सवनिमित्त पाळणा सर्वश्री सौ. ज्योती सावंत, प्राची प्रमोद कांदळगावकर, पल्लवी दळवी, मंगल आंगणे, काव्या दळवी यांनी सुरेल आवाज गायला. तर सुस्वर भजन बुवा नंदेश संगमेसकर आणि बंधू यांनी गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याला तबला वादक वसंत घडशी यांची साथ लाभली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक संतोष पराडकर यांना पोलीस सेवेतील पदोन्नती प्राप्त झाली. याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
स्थानिक आमदार मिहिर कोटेजा, माजी नगरसेवक नंदकुमार वैती, प्रकाश गंगाधरे ,उद्योगपती सुनील आचरेकर, नारायण तथा नाना राऊळ आदी मान्यवर अतिथीचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रवि नाईक, संजय काळे, माई राऊळ आदी उपस्थित होते. सौ. राजश्री चंद्रकांत सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मंडळाचे उपसचिव सुनील मगदूम यांनी छान केले.