आमदार दीपक केरकर यांचा इशारा : कलंबिस्तमध्ये शिवसेना सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, परंतु विकासकामे करण्यास ठेकेदार कुचराई करत आहेत. जे ठेकेदार कामे करण्यास दिरंगाई करत असतील त्या ठेकेदारांना काळय़ा यादीत टाकले जाईल, असे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज उभारले जात आहे. अनेक प्रकल्पही आता कार्यान्वित होणार आहेत. या भागातील रोजगाराचा प्रश्नही आता लवकरच निकाली निघेल. गावागावातील रस्त्यांना मोठया प्रमाणात सरकारने निधी दिला, परंतु ठेकेदार कामे करण्यास दिरंगाई करत आहेत. ठेकेदार काही लोकांचे आणि त्यांचे साटेलोटे आहेत. हे आता चालणार नाही, असे ते म्हणाले. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल, कलंबिस्त, कोलगाव, दाणोली, आंबोली भागात घेण्यात आलेल्या शिवसेनेच्या सभासद नोंदणी मेळाव्यात ते बोलत होते.
कलंबिस्त येथील गणशेळवाडी दत्ताराम नेवगी यांचा घरी झालेल्या या मेळाव्यास व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन तथा शिवसेनेचे तालुका निरीक्षक सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, माजी पंचायत सदस्य रमेश सावंत, उपतालुका संघटक बळीराम सावंत, उपविभाग उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, दिलीप राऊळ, सुरेश शिर्के, जीवन लाड, पाडुरंग राऊळ, सरपंच अविनाश सावंत, सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ, सुभाष रेमुळेकर, जीवन लाड, संतोष चव्हाण, भाऊ राऊळ, उदय राऊळ, सुरेश सावंत, सत्यवान परब, प्रभाकर राऊळ, उत्तम शिर्के, विठ्ठल सनाम, सुजल रमुणकर, दिलीप राऊळ, मनोज राऊळ, अनिल लिगंवत, महाबळ शेटवे, आनंद सावंत, सुभाष सुर्वे, रमाकांत भिकारी, विलास राणे, अनिता धोंड, शिवा धोंड, तालुका महिला संघटक अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, बळीराम सावंत, रामचंद्र भिंगारे, विलास राणे, पाडुरंग सावंत, संतोष पास्ते, बाबा पास्ते, कुसाजी सावंत, चंद्रकात तावडे, धनाजी सावंत, दशरथ पास्ते, अनिल सावंत, भिकाजी सावंत, प्रकाश मेस्त्री, बाळकृष्ण मेस्त्री, रामचंद्र सावंत, दत्ताराम बिडये, गजानन राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर पुढे म्हणाले की, मोठय़ा प्रमाणात विकासनिधी या जिल्ह्यात आला आहे. आपण पालकमंत्री असताना विकासकामे व रस्त्यांसाठी निधी दिला, परंतु ठेकेदाराने कुचराई केली. त्यांचे आणि प्रशासनात साटेलोटे होते. त्यामुळे कामे मार्गी लागू शकली नाहीत. आता जे ठेकेदार दिरंगाई करतील त्यांना मात्र काळ्या यादीत टाकले जाईल. विकासनिधी उपलब्ध असल्यामुळे सह्याद्री भागाचा कायापालट निश्चित होणार आहे. त्याच्या माध्यमातून विकास साधला जाईल. चांदा ते बांदा योजना कार्यान्वित केली जाईल. हा सह्याद्रीचा भाग मिनी कश्मीर आहे. त्याचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
युवकांना गावातच रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न : सतीश सावंत
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत म्हणाले की, पशु व कृषीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा विकास करून घ्या. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक योजना शेतकरयांसाठी आहेत त्यांचा लाभ घ्या. शासनाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत त्याचा लाभ घेऊन येथील तरुणांना गावातच कसा रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
यावेळी जान्हवी सावंत, संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आदींनी आपले विचार मांडले. यावेळी मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मोठया प्रमाणात शिवसेना सभासद नोंदणी करण्यात आली.