*”शहरी समाज लोकसाहित्यापासून वंचित!” – नरेंद्र पेंडसे*
पिंपरी
“नारदीय भक्तिसूत्र असो की थालगाणे, अशा अनेक परंपरा आणि लोकगीते, लोककथांच्या माध्यमातून साहित्य तळागाळातील लोकांपर्यंत झिरपत गेले आणि आजही टिकून आहे; पण त्यामानाने अशा लोकसाहित्यापासून शहरी समाज वंचित राहिला आहे!” असे विचार समरसता गतीविधीचे समन्वयक नरेंद्र पेंडसे यांनी सोमवार, दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या ‘साहित्यसंवाद’ या उपक्रमांतर्गत आयोजित युवासंमेलनात ते बोलत होते. यावेळी समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने नवोदित आणि युवा कवींसाठी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार प्रदीप तळेकर होते; तर नरेंद्र पेंडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मातंग ऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मधुश्री ओव्हाळ यांची निवड झाल्याबद्दल अनुक्रमे अरविंद दोडे आणि शोभा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कविसंमेलनात ईश्वरी हातोळकर, आदेश कोळेकर, आत्माराम हारे, वेदान्ती घुमरे, नयन गोवंडे, रूपाली हंबर्डे, सुप्रिया लिमये, वैशाली मराठे, राजेंद्र भागवत, अशोक वाघमारे, नीलेश शेंबेकर, रघुनाथ पाटील, दीपाली पवार, श्रावणी भिसे, अनुशा पवार, मीना पवार, फरीदा अंसारी, भारती काळे, सुरेश जोशी आदींनी आपल्या कविता सादर केल्या. जयश्री श्रीखंडे, कैलास भैरट, बाळासाहेब सुबंध, अशोक महाराज गोरे यांनी संयोजनात मदत केली. शाखेच्या अध्यक्ष उज्ज्वला केळकर यांनी प्रास्ताविक केले. सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले; तर मानसी चिटणीस यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*