*अटल काव्य सम्मेलन*
भारतीय जनता पार्टी – किसान मोर्चा सिंधुदुर्ग तर्फे आयोजित कवि सम्मेलन हे भारताला अण्वस्त्रसज्ज बनविणाऱ्या कविमनाचे माजी पंतप्रधान स्व.अटलजी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आयोजित केले होते.
या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाला सिंधुदुर्गातील कवी व कवयित्री यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हे कवि सम्मेलन आधुनिक पध्दतीने म्हणजे ऑनलाईन घेतले यामध्ये कोकणातील एकुण एकशेवीस कवींनी सहभाग घेतला, दिवसभरातील चाचणीमधून अठरा जणांची अंतिम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली व या अठरा जणानी संध्याकाळी आठ वाजता घेतलेल्या झूम मिटींगमध्ये आपल्या कवितांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टी – सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या प्रस्तावनेने झाली या कार्यक्रमाचा उद्देश सांगता सांगता प्रभाकरजीनी हळुवारपणे एक सुंदर कविता सादर केली आणि कवि सम्मेलनाला अधिक रंग भरला.
जिल्ह्य़ाचे उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई यांनी आपल्या मनोगतामध्ये या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना सर्व कवींना शुभेच्छाही दिल्या.
जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रियांका साळस्कर यांनी आपल्या मनोगतात स्व. अटलजींच्या कविमनावर भाष्य केले.
किसान मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत यांनी किसान मोर्चा विविध क्षेत्रात कार्यरत आहे त्याबद्दल माहिती दिली.
किसान मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.ज्ञानेश पोतकर यांनी आपले मनोगत कविता सादर करुन व्यक्त केले.
कवयित्री सौ.ज्योती देसाई यांनी अटलजीची एक कविता सादर केली, बाकी कवी व कवयित्रीनी विविध विषयांवरील स्वरचित रचना सादर केल्या.
यात प्रामुख्याने सौ.वर्षाराणी अभ्यंकर, संजय म्हापसेकर, सौ.सुषमा सावंत, गणेश सागवेकर, सौ.मधुरा माणगांवकर, ॲड.ज्ञानेश पोतकर, सौ.मनस्वी घारे, प्रदीप हिरनाईक, सौ.चंचल काळे, बाळा कदम, सौ.दिपाली कांदळगावकर, विठ्ठल लाकम, सौ.शमा धानजी, बाबु घाडीगांवकर, नारायण धुरी, अशोक वाळवे, सौ.ज्योती देसाई, डाॅ.सारिका डेरले, अजित जोग
कवीनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन भाजपा किसान मोर्चाचे कोकण विभागाचे संयोजक डाॅ.भाई बांदकर यांनी केले.
कार्यक्रमानंतर सर्व सहभागींना डिजिटल सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.