You are currently viewing आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

आचरा :

 

काही वर्षापासूनची आचरा बाजारपेठसाठी वेगळा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा अशी मागणी आज पूर्णत्वास येऊन या बाजारपेठसाठी आवश्यक असलेला ट्रान्सफॉर्मर विद्युत वितरण कडून बसवण्यात आला आहे. आचरा गावचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला.

यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, आचरा वीज वितरण कनिष्ठ अभियंता अनिल मटकर, व्यापारी संघटना अध्यक्ष वामन आचरेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, रामेश्वर पतसंस्था अध्यक्ष मंदार सांबारी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, हेमंत गोवेकर, व्यापारी गणेश वळंजू, सुरेश ठाकूर, सुधीर मुणगेकर, बाळू कोदे, अर्जुन बापर्डेकर, वीरेंद्र पुजारे, उदय घाडी, अर्जुन दुखंडे, भाई नलावडे, निखिल ढेकणे, पिंटो साळकर आदी उपस्थित होते.

आचरा बाजारपेठसाठी होणार विजेचा पुरवठा हा गेली कित्येक वर्षे कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवरून होत होता. त्यामुळे बाजारपेठ भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असे. याठिकाणी आणखी ट्रान्सफॉर्मर बसावण्यात यावा अशी मागणी व्यापारी संघटना खजिनदार जयप्रकाश परुळेकर व व्यापारी यांनी सातत्याने केली होती. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा नविन ट्रान्सफॉर्मर मिळाला आहे. गेली कित्येक वर्षे असलेली मागणी पूर्ण झाल्याने व्यापारी वर्गाकडून समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा