You are currently viewing स्मृति भाग १६

स्मृति भाग १६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग १६*

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण पराशर स्मृतिमधील अजून काही श्लोक पाहू .

 

*अच्छिद्रमिति यद्वाक्यं वदन्ति क्षितिदेवताः ।*

*प्रणम्य शिरसा धार्य्यमग्निष्टोमफलं हि तत् ॥*

” दोषरहित ” असे जे वाक्य भूदेवता ( ब्राह्मण ) सांगतात ते शिरोधार्य मानले पाहिजे . कारण ते अग्निष्टोम यज्ञाचे फळ देणारे असते .

हा श्लोक मी मुद्दाम निवडला . माझ्या नजरेतला ब्राह्मण वा मला पूर्वजांकडून कळलेला ब्राह्मण सांगतो .

अदमासे तीनचारशे वर्षापूर्वी लागलेले विज्ञानाचे वेड अजूनही संपलेले नाही ! पण त्या विज्ञानाने मानवी वृत्ती बदलली व भरपूर कायदे होवू लागले . आजची परिस्थिती , माणसाला विज्ञान व कायद्याच्या मर्यादा अजून समजल्या नाहीत . यात आपला परका होत गेला . समानतेची भूक वाढून भांडणे वाढली . पर्यायाने माणूस अध्यात्म व सुखाची गुरुकिल्ली हरवून बसला .

१) निरपेक्ष नैतिक मूल्य , २)प्राणीमात्रांची एकता व शुद्धता , ३) जीवनातील एकता , सुसूत्रता , अनुस्यूतता , अखंडितता , सातत्य , ४)न्यायावर भक्तीचा कर्मविपाक आणि ५) विश्वामागील सुसूत्र बुद्धि ह्या पाच सूत्रांवरील अविचल श्रद्धा डळमळली व आज पूर्ण उडण्याच्या मार्गावर आहे . असमर्थाकडे समर्थाने १)परोपकार ,२)दया आणि ३) करूणेने पहावे व Divine brotherhood under the fatherhood of god असे रहावे , हे विसरला . भावजीवन समृद्ध करणारा धर्म आमच्याच संस्कृतीचे लोकांमुळे आमच्यापासून दूर झाला . १९४७ च्या आगोदर जवळपास दीडहजार वर्षात इतरेजनांचे राज्यकारभाराने असे घडत गेले . त्याची परिसीमा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अतिरेकात झाली . भारतातील राज्यकर्त्यांनी भावजीवन समृद्ध करणारा ब्राह्मण लयास घालवला व हाजी करणारा ब्राह्मण ताजातवाना ठेवला . मग ब्राह्मणत्वाचे अर्थच बदललेले पहावयास आज मिळतात .

वामनाने बळीला मारला . रामाने रावणासारख्या शांकरभक्तास मारले . श्रीकृष्णाने दुर्योधनास पांडवांना हाती धरुन उद्ध्वस्त केले . वास्तविक बळी धार्मिक , यज्ञ करणारा होता . रावणाने वेदांना स्वर लावले ! दुर्योधन व जरासंध विष्णुयाग करणारे होते ! पण ज्या ब्राह्मणांना ते मान्य होते ते खरे ब्राह्मणच नव्हते ! मग भगवंतास मान्य काय होते ? तर यज्ञ करणारे उत्तम ब्राह्मण असून पण त्याला अवतार घ्यावे लागले ?

प्रश्न हा पडतो की , फक्त शेंडी , यज्ञोपवित वा भस्माचे पट्टे ओढून अंधपणाने कर्मकांडाला चिकटणारे खरे ब्राह्मण असतात ? यांना खरा धर्म कळतो ? ” जगात कुणी हलका नाही , जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ब्राह्मण होण्याचा ( गुणकर्माने ) अधिकार आहे ” हेच खरे व १)नफ्यासाठी मैत्री , २) सुखासाठी मैत्री , ३)तत्वासाठी मैत्री व ४) भक्तीसाठी मैत्री , यातून चवथी गोष्ट हा खरा धर्म जगास समजावून सांगणारा कुणी आहे का आज ? तो खरा ब्राह्मण ! बाकी सारे पोटार्थीच !! ते खरे ब्राह्मणच नाहीत !!

मृत्युप्रसंगी धीर देतो , श्राद्धात यजमानाचे दुःख हलके करतो , विवाहात जीवनाचे मर्म मार्गदर्शन करतो , यापेक्षाही अधिक जो जीवनात कृतज्ञता शिकवतो आणि जो दुसर्‍याकडे वा शेजार्‍याकडे संस्कृती घेवून जातो वा संस्कृतीसाठी रक्ताचा थेंब अन् थेंब खर्च करतो , तो ब्राह्मण .

१)शिक्षक , २)संत, ३)ब्राह्मण, ४)व्याख्याते, ५)पालक, ६)वृत्तपत्रे, ७)वाङ्मय आणि ८) सिनेमा . या अष्टगुरु संस्थेमधून सर्वच बिघडल्यावर समाजाचे कसे व्हायचे ?

आज इतरांसह ब्राह्मणही बिघडला आहे . ब्राह्मण संस्था अधःपतित आहे . एखाद्या तत्वासाठी सगळे जीवन समर्पित करणारा ब्राह्मण आज विरळाच ! पूर्वी गावागावात असा ब्राह्मण पसरलेला होता . अध्यात्मिक आणि नैतिक उन्नतिसाठी रक्ताचा कण कण वेचणारा ब्राह्वण होता. त्यास भूदेव ही संज्ञा होती . कारण स्वतःचे भौतिक उन्नतीकडे दुर्लक्ष करुन सर्वांच्या अध्यात्मिक उन्नतीकडे झटणारा तो होता. आज या समग्र विचारांनी पांगळा असलेला आहे . तो उन्नत व्हावा , ही ईशचरणी प्रार्थना .

विनंती इतकीच , पराशर स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*Job Vacancy !! Job Vacancy !!*👩🏻‍💻🧑‍💻👨‍💻

 

*सविस्तर वाचा 👇*

————————————————–

😇 *LIFE GOALS DONE*😇

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

 

🧑‍💻👩🏻‍💻 *Job Vacancy*👩🏻‍💻🧑‍💻

 

▪️Part Time / Full Time

▪️Earn Extra Income

▪️Post – Agency Sales Officer

▪️Qualification – 12th Above

▪️Fix Salary – 30,000/- ▪️Work Day / Training / Support Provided

▪️Employees / Housewife / Retired Person / Businessman / Professionals

 

📱Branch Head – 8087757388, 8550934448

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

🏢 Job Location – Sawantwadi

🏢 Branch Office – Mapusa, Goa

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा