You are currently viewing सौर ऊर्जा हायमास्टचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

सौर ऊर्जा हायमास्टचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

सौर ऊर्जा हायमास्टचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण….

सावंतवाडी

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून २ लाख ६४ हजारांचा सौर ऊर्जा हायमास्ट बाजारपेठ मेन रोड येथील श्री भवानी चौक रिक्षा स्टँड नजिक तिठ्यावर बसविण्यात आला. रविवारी रात्री मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते याच लोकार्पण करण्यात आले.

आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री भवानी चौक सालईवाडा रिक्षा स्टॅण्ड नजीक मेन रोड तिठा येथील सौर ऊर्जा हायमास्टचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी श्री साईबाबा मंदिर येथे दीपक केसरकर यांचा स्थानिकांच्या वतीने शहरामध्ये भरघोस निधी देऊन विकासात्मक कामे केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तर शहरातील गरजेच्या ठिकाणी हायमास्टसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा विशेष सन्मान मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,जावेद शेख,संतोष गांवस,साबाजी नार्वेकर,शैलेश गवंडळकर,सुनिल नाईक,डॉ. मुरली चव्हाण,बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष अर्चित पोकळे, नगरपरिषदेचे प्रदीप सावरवाडकर,कॉन्ट्रॅक्टर प्रसाद नार्वेकर,स्वीय सहाय्यक रामचंद्र आंगणे,विलास बिद्रे,सुजित कोरगांवकर,आबा केसरकर,हॉटेल व्यावसायिक पांडुरंग वर्दम,प्रतिक बांदेकर,प्रथमेश प्रभू,मेहर पडते,गौतम माठेकर,नंदू शिरोडकर,पंकज बिद्रे,जोसेफ आल्मेडा,पवन बिद्रे,यल्लापा दोडामणी,मंथन जाधव,शुभम बिद्रे,वैभव दळवी यांसह बाजारपेठ मधील नागरीक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा