You are currently viewing अखिल दाभोळखाडी भोई समाज आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा संपन्न

अखिल दाभोळखाडी भोई समाज आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा संपन्न

नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

अखिल दाभोळखाडी भोई समाज आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मानसरोवर येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, चिपळूण, गुहागर या तालुक्यांतील तसेच नवी मुंबईतील नोकरीसाठी इच्छुकांनी मुलाखतीत भाग घेतला.

सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या अखिल दाभोळखाडी भोई समाजाने आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून रोजगार मेळावा यशस्वी करण्यात आला. सदर मेळाव्यास शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद, सरचिटणीस प्रकाश ओहळे, मिडीया टीमचे अनिल पानस्कर, अखिल दाभोळखाडी भोई समाजाचे अध्यक्ष विनायक निवाते, सचिव रामचंद्र पडवळ, उपाध्यक्ष शांताराम जाधव, कोषाध्यक्ष प्रभाकर दिवेकर यांसह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यास प्रसिद्धी विभागाचे प्रमुख विनोद निगडे आणि विनायक सैतवडकर यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मेळाव्यास शिवसेनेचे कळवा येथील विभागप्रमुख अरविंद सैतवडकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा