You are currently viewing झाराप -पत्रादेवी महामार्गावर कारचा अपघात…

झाराप -पत्रादेवी महामार्गावर कारचा अपघात…

झाराप -पत्रादेवी महामार्गावर कारचा अपघात…

समोरील कारला धडक देत ब्रिज वरून सर्विस रोडवर कोसळली; दोन्ही कारचे नुकसान…

सावंतवाडी

झाराप पत्रादेवी बायपासवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गोव्यातील वेगवान कारने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार महामार्गालगतच्या रेलिंग वरून पलीकडे सर्विस रोडवर जाऊन कोसळली.ही घटना आज सायंकाळी
४.३० वाजताच्या सुमारास घडली.

दरम्यान यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गाडीतील लहान मुली किरकोळ जखमी झाल्या. तर समोरील पिंपरी चिंचवड येथील कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा