You are currently viewing वायंगणी येथील श्री दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न

वायंगणी येथील श्री दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न

मालवण :

 

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी, होमहवन, कलशारोहण सोहळा मसुरे गावचे सुपुत्र उधोजक डॉ दीपक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले. कार्यक्रम प्रसंगी “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” चा जयघोष चालू असल्याने वातावरण भक्तिमय बनले होते. रविवारी उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या हस्ते कलश पूजन तर कलशारोहण श्री. रामदास प्रभू यांच्या हस्ते झाले. रविवारी सकाळी ८ वाजता श्री दत्त आणि श्री संत दादा महाराज समाधीची नित्यपूजन, होमहवन, धार्मिक विधी व कलश पूजन, दुपारी श्री दत्त मंदिर कलशारोहण, महाप्रसाद, श्री संत दादा महाराज दिनदर्शिका प्रकाशन, श्री. सिताराम करमरकर यांच्या हस्ते श्री संत दादा महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत भक्ती लिलामृत भाग १,२,३ कादंबरी कल्याण कटोरा व आरती संग्रह या पुस्तकांचे मोफत वाटप, श्री. मनिष राऊळगावकर यांचा सत्कार सोहळा, रात्री भजन स्पर्धा झाली.

आज २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री गुरुदेव दत्ताची आणि श्री संत दादा महाराज यांच्या समाधीची नित्यपूजन, १० वाजता दत्तयाग, भजन, आरती, धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता स्थानिक भजने होणार असून २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नित्यपूजा धार्मिक कार्यक्रम, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता भिक्षाफेरी, १० वाजता गादीवर भिक्षा घेणे, १०:३० वाजता कीर्तन, १२ वाजता दत्त जन्म, रात्री १ वाजता पालखी अशाप्रकारे तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यावेळी नाना करमळकर, हनुमंत प्रभू, सुरेश ठाकूर, रामदास प्रभू, मनिष राऊळगावकर,मोहन प्रभू, श्री टिकम, संजना रेडकर, बाबू हडकर, रुपेश अवसरे, श्री कोळंबकर, घाडीवाडी मित्रमंडळ वायंगणी व ओमसाई भजन मंडळ वायंगणी व दादा महाराज भक्त परिवार उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा