रेडे घुमट बांदा संवर्धन मोहीम क्रमांक ३
दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत आयोजित मोहीम
आज रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी बांदा येथील रोजे घुमट वर दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत रोजे घुमट येथे संवर्धन मोहीम आखण्यात आलेली होती. या संवर्धन मोहिमेत झुडपांनी अदृश्य झालेल्या रोजे घुमटाने मोकळा श्वास घेतला. पावसात पुन्हा एकदा घुमटाच्या आजूबाजूला झाडी वाढलेली होती. आज दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजित मोहिमेत पुन्हा एकदा स्वछता करण्यात आली.
या मोहिमेत गणेश नाईक, प्रसाद सुतार, समिल नाईक, शिवाजी परब, रोहन राऊळ, सच्चीदानंद राऊळ, शितल नाईक, गार्गी नाईक, संजना मयेकर, प्रकाश कडव, विशाल परब, साईप्रसाद मसगे,अक्षय कविटकर, विजय धामापूरकर, प्रणिता मांडवकर, राहुल मांडवकर, ऋतुजा पटेकर, सानिया कुडतरकर, ऋतुराज सावंत, जक्कापा पाटील आदींनी सहभाग घेतला. या मोहिमेसाठी सुनील धोंड, सच्चीदानंद राऊळ व शंकर कोराणे यांनी प्रत्येकी कोयता दिला. सचिन नाईक, जकाप्पा पाटील, निलेश मोरजकर यांनी सहभागी मावळ्यांना नाश्ताची सोय केली त्यांचे दुर्ग मावळा तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.