You are currently viewing डॉक्टरांना गुन्हेगार मानले जाणार नाही केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन

डॉक्टरांना गुन्हेगार मानले जाणार नाही केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*डॉक्टरांना गुन्हेगार मानले जाणार नाही केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

कोणताही डॉक्टर रुग्णावर उपचार करताना त्याच्या मनात गुन्हेगारी हेतू नसतोच, या दृष्टिकोनाचा आयएमए नेहमीच पुरस्कार करित आलेली आहे. जोपर्यंत हानी पोहोचवण्याचा उद्देशच नसेल तोपर्यंत, वैद्यकीय अपघात किंवा अगदी निष्काळजीपणा देखील गुन्ह्याच्या मापदंडांना कसा पात्र होईल? जर वैद्यकीय व्यवसाय, अपघात किंवा निष्काळजीपणा या गुन्हयाच्या व्याख्येत बसत नसेल तर डॉक्टरांवर फौजदारी खटला चालवणे म्हणजे अतार्किक कारवाई होते. एकोणिसाव्या शतकातील वसाहतवादी कायद्याने होणारा अन्याय केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेमध्ये गुन्हेगारीच्या सीमा नव्याने परिभाषित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भारतीय संसद या शतकानुशतके जुन्या अन्यायातून मुक्ती देणारा इतिहास घडवू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लॉर्ड डेनिंग यांनी म्हटल्याप्रमाणे या कायद्याने देशातील डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या डोक्यावर सतत कारवाईची टांगती तलवार असल्याच्या दडपणाखाली रुग्णावर उपचार करतील ते दडपण आता दूर होण्याच्या मार्गावर आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले की, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास तो खून मानला जात असे आणि त्यांना शिक्षा केली जात असे. आम्ही एक दुरुस्ती आणणार आहोत, ज्यात डॉक्टरांना यातून मुक्तता किंवा सूट देण्यात आली आहे, त्यासाठी इंडिअन मेडिकल असोसिएशननै (आयएमए) विनंती केली होती.

या देशातील डॉक्टरांच्या दुर्दशेविषयी त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. किंबहुना, वैद्यकीय समाजाला वसाहतवादी कायद्याच्या जाचक साखळीतून मुक्त झाल्यासारखे वाटेल. या निर्णयाचे परिणाम दूरगामी आणि रुग्णाच्या हितासाठी असतील. डॉक्टर पुन्हा एकदा गंभीर क्षणी, सर्वशक्तीनिशी, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धोका पत्करण्यास मोकळे होतील. वैद्यकीय व्यावसायिक सहेतुक हानी पोहोचवण्याच्या विरोधातच काम करतात आणि जगभरातील त्यामुळेच गुन्हेगारी दायित्व नसण्याचा समर्थनार्थ असतील या ऐतिहासिक निर्णयाचा परिणाम सीमांच्या पलीकडे जाईल आणि डॉक्टरांना गुन्हेगार म्हणून वागवण्याची पद्धत बदलेल. आयएमएने गेल्या काही वर्षात घेतलेल्या तत्वनिष्ठ भूमिकेला न्याय मिळाला आहे. आयएमए देशाच्या सेवेसाठी नेहमीच कटिबध्द आहे. कोविडची लढाई आयएमए आणि भारतातील वैद्यकीय समुदायाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढली. भारत सरकारने मंजूर केलेल्या आणि भारतात उत्पादित केलेल्या कोविड लसींनी भारतातील साथीच्या रोगाचा प्रसार थोपवला. तद्वतच एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी आयएमए भारत सरकारसोबत कायमच होती, आहे आणि असेल, असे उद्गार आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी काढले. त्यावेळी उपाध्यक्ष डॉ. अनिल आव्हाड देखील उपस्थित होते.

भारतातील वैद्यकीय व्यवसायासाठी होऊ घातलेल्या क्रांतिकारी बदलाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आयएमए महाराष्ट्र राज्याचे सचीव डॉ. सौरभ संजानवाला यांनी आभार मानले आहेत.

संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा