You are currently viewing दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी  4 जानेवारीपर्यंत अर्ज करा

दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी  4 जानेवारीपर्यंत अर्ज करा

दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी  4 जानेवारीपर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी

दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनांसाठी 4 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे, आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ मर्या.चे  जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

            योजनेचा उद्देश, दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/ कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे. योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल दिनांक 3.12.2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी  https://evehicleform.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा