बेशुद्ध पडलेल्या वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा आधार
सावंतवाडी
येथील जिमखाना मैदान परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या वृद्धाला सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी आधार दिला. यावेळी त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुकाराम म्हापणकर (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. गेले चार-पाच दिवस ते शहरात फिरत होते. अन्न, पाणी नसल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सामाजिक बांधिलकीला दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, शेखर सुभेदार, पोलीस बीट हवालदार प्रसाद कदम, गणेश खोरागडे, लखन पाटील, साहिल खरागडे आदींनी सहकार्य केले. संबंधित वृद्ध व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत.