टाटा मोटर्स च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..
बनली पहिली भारत एन कॅप सेफ्टी प्रणाली युक्त बनवणारी कार..
नवी दिल्ली:-
कार सेफ्टी रेटिंग अंतर्गत नव्यानेच लागू झालेली स्वायत्त भारतीय कार सेफ्टी प्रणाली *भारत एन कॅप* ने टाटा हॅरीअर आणि टाटा सफारी या वाहनांना भारतात प्रथमच प्रमाणित केल्या आहेत..
ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग मध्ये आपला ठसा जागतिक पटलावर उमटल्या नंतर देखील संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत भारत सरकारने लागू केलेली पूर्णतः भारतीय *भारत एन कॅप* ५ स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त करणारी टाटा मोटर्स ही पहिली कंपनी ठरली आहे.
केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी यांनी आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाउंट वरून याची घोषणा करीत टाटा मोटर्स चे अभिनंदन केले आहे..
ग्राहकांनी आपले कुटुंब प्रवास दरम्यान सुरक्षित आहे की नाही याची खात्री करून घेणे ही आजची कार खरेदी करते वेळी आवश्यकता बनली आहे.टाटा कार्स चा अनुभव घेणे करिता आजच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चे अधिकृत विक्रेते एस.पी. ऑटोहब चे रत्नागिरी,चिपळूण अथवा कणकवली येथील शो रूम ला एक वेळ अवश्य भेट द्यावी. सोबत डिसेंबर धमाका अंतर्गत असलेल्या अनेक सवलतींचा लाभ ग्राहकांनी उठवावा असे आवाहन पत्रका व्दारे करण्यात आले आहे