You are currently viewing स्मृति- भाग ११

स्मृति- भाग ११

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति- भाग ११* 

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण *कात्यायन* स्मृतितील श्लोक पाहू .

 

*पृष्ठवंशे च नाभ्यां च धृतं यद्विन्दते कटिम् ।*

*तद्धार्यमुपवीतं स्यान्नातो लम्बं न चोच्छ्रितम् ॥*

पाठीवर मेरुदण्डावर व नाभीवरुन कटिप्रदेशापर्यंत पोहोचणारे उपवीत ( जानवे ) धारण करण्यास योग्य असते .

ह्या सुंदर श्लोका इतकं जानवं सर्व अवस्थेत म्हणजे बाल्यावस्थेत इ. तसेच शरीरावस्थेत प्रत्येकाला मिळाले असेलच , असे मुळीच नाही . जानवं तयार करणारे सगळे शास्त्रोक्तच तयार करत असावेत ! माझे दुमत नाही ! पण पाचवीतल्या मुलाने घालावयाचे व तरुणाने घालावयाचे , यातला फरक तयार करणार्‍या ब्राह्मणांना अजिबात कळला नाही . जाड वा बारीक अथवा बुटका वा उंच असं कुठल्याच अवस्थेचं भान न ठेवता जानवी बनवली गेली ! वरुन अक्कल पाजळणारे खूपच ! ते असं प्रमाणात असावं ! तसं असावं ! पण जानवी टाकण्याची अशी कारणे असावीत ?

परदेशात जाणारा ब्राह्मण पण बहकला होता ! अमेरिकेत जावून आल्यावर आमच्याच घरातले बिघडले ! सर्वांची कथा तशीच !!

पैशाचे जोरावर प्रथम वैश्यांनी , नंतर अति युद्धजन्य परिस्थितीमुळे क्षत्रियांनी आणि विज्ञानवादाच्या मोहापोटी ब्राह्मणांनी जानवे सोडले . असे सगळे द्विजांनी सोडले . बरं सोडलं तर नुकसान काहीच नाही ! पण आज आमच्या संस्कृतीवर वार सुरु असतांना त्याला उत्तर ब्राह्मण देवूच शकत नाही ! नुसते परशुरामाचे नाव घेवून शर सांभाळण्याचे ही सामर्थ्य येत नाही व शापाचेही सामर्थ्य येत नाही ! आणि शाप या शब्दावर कुणी चिंतन केले असेल असं मला वाटतच नाही !?!? आपण हीन झालोत , हे मान्यच केलं पाहिजे . जे मानत नाहीत , त्यांना नमस्कार .

जानवं असण्याचा सोपा अर्थ मला समस्त स्वाध्यायींचे हृदयस्थ प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले दादाजींकडून कळला . *” देव माझ्यासोबत आहे “* येवढाच अर्थ ! बाकी ठीक आहे , नऊ तंतुंच्या नऊ देवता ! ब्रह्मगाठ ! इ. काय काय ऐकायला मिळते ! मी चूक म्हणत नाही ! पण प्रत्येकाला समजेल अशा भाषेत आम्ही समजावू शकलो नाही ! आमच्यांनाच नाही तर बाकीच्यांची कथा काय वर्णावी ! असो , पण जानवं असावं .

 

*आयुर्बलं यशो वर्च्चः प्रजाः पशून् वसूनि च ।*

*ब्रह्मप्रज्ञाञ्च मेधाञ्च त्वन्नो धेहि वनस्पते ॥*

” हे वनस्पते तू आम्हास आयु , बल , यश , तेज , उत्तम सन्तान ( सम्यक् तनोति इति सन्तानः म्हणजे आपल्या पूर्वजांच्या उत्तम गुणांचा वारसा जी सम्यक् म्हणजे बरोबर पुढे चालवतात व पुन्हा उत्तम गुणांची भर टाकतात ती सन्तान म्हणजे मुलं ! ) , पशु , धन , वेद , प्रज्ञा आणि मेधा दे . ”

ही प्रार्थना दात घासतांना म्हणायची असते . काही आमचेच हुशार लगेच प्रश्न उपस्थित करतीलच ! ” असं म्हटल्याने खरंच मिळते का ? ” नसेल तर म्हणायचं कशाला ? ” त्याचं उत्तर आहे , आज श्रद्धाच उडाली आहे त्यांना काय सांगायचं ? पण एक सांगतो , आयुष्यात मला कसं व्हायचंय याची जाणीव या श्लोकाने नाही मिळत ? एक दिवस झोप नाही आली तर डाॅक्टरच ! आयुष्यात श्रद्धा नको ! प्रत्येक कृती करतांनाचे श्लोक आहेत . जे उच्चारल्यावर आपण कसं असावं याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही ! एक उदा. गणपतीस शंकराने हत्तीचे डोके लावले . मी मानतोच ! कारण शंकर रसशास्त्राची देवताच आहे . शास्त्रसंपन्नच होता शंकर . अशक्य काहीच नाही . पण जे मानत नाही त्यांचेसाठी सांगतो , सख्या बापाशी युद्ध खेळणारा पुत्र काय कामाचा ? मी म्हणतो , ” शंकराने त्यांच डोकं उडवलं नाही ! *ते बदलवलं !* क्षात्रतेजासह ब्राह्म्य तेजाचे बीजारोपण शंकराने केले व नंतर तो नावारुपास आला . असे उत्तम अर्थ सांगण्याचा जर प्रत्येकाने केला तर समाज मानणार नाही ! आणि सगळ्यात नुकसान अति धाकाने केलं आमचं ! क्रोध , जरब आणि हीन वाक्यरचनांनी अवघा समाज रसातळास जात आहे . पण मानायला कुणीच तयार नाही , ही खंत घेवून बरेच वैकुंठास जात असावेत !

 

*सन्ध्यालोपाच्च चकितः स्नानशीलश्च यः सदा ।*

*तं दोषा नोपसर्पन्ति गरुत्मन्तमिवोरगः ॥*

ज्यास सन्ध्या न करण्यामुळे भय वाटते , सतत स्नान करण्याचा स्वभाव असतो , जसे गरुडाजवळ साप भटकत नाहीत तसे दोष त्याचेजवळ भटकत नाहीत !

किती साध्या सुंदर शब्दात समजावले आहे ? मला एक प्रश्न सतावतो , तो असा . विश्वामित्र रामाचे समकालीन . त्यांनी गायत्री मन्त्राचा शोध लावला . त्यापूर्वी सन्ध्या कशी असावी ? कारण कृतयुगात काय स्वरुप असावे सन्ध्येचे ? माझ्या आयुष्यात एक दत्तस्वामी म्हणून यति आले . त्यांनी ऋग्वेदोक्त पवमान शिकवले व ते निघून गेले . पुन्हा भेट नाही . ते म्हणाले , ” सन्ध्या म्हणजे समूह प्रार्थना , हा वैदिक अर्थ सांगतो , विसरु नकोस ! ” ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी प्रकाश टाकावा . सम्यक् ध्यान म्हणजे सन्ध्या , सम्यक् समूह ध्यान असं नाही म्हणता येणार ? ब्राह्मण समूह ध्यान विसरला व आत्मकेंद्रीत झाला . हे र्‍हासाचेच कारण ! तो सांगत असेल , ब्रह्मदेवाचे मुखापासून जो उत्पन्न झाला तो ब्राह्मण ! पण आजचं चित्र वेगळं आहे . जो तोंडाने बिघडला आहे ! हे स्वरुप आहे ! ( वैयक्तिक कुणी घेवू नका . ) असो .

सांगायचे एवढेच , *कात्यायन* स्मृति वाचनीय आहे . उद्या पुढील भाग पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा