समाजात चुकीची माहिती पसरणार नाही याची काळजी घ्या –
सौरभकुमार अग्रवाल
शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थितांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी
समाजात वावरत असताना विविध समाज माध्यमातून छोट्या मोठ्या घडलेल्या घटनांमधून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटना घडू नयेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याची खबरदारी घेणे. समाजात गैरसमज पसरवला जाणार नाही. चुकीची माहिती पसरली जाणार नाही, याची काळजी घेवून समाज माध्यमातून मिळालेली माहिती वेळोवेळी पोलीस ठाणे येथे कळविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या शांतता समिती सदस्य व पोलीस पाटील बैठकीत केले.
पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटीचे सदस्य व पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा विशेष शाखा विभागाचे पोलिस निरीक्षक झावरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम यांच्यासह २० ते २५ शांतता समिती सदस्य व पोलीस पाटील उपलब्ध होते.