You are currently viewing न्हावेली येथे पशुधन वंधत्व निर्मूलन कार्यक्रम…

न्हावेली येथे पशुधन वंधत्व निर्मूलन कार्यक्रम…

न्हावेली येथे पशुधन वंधत्व निर्मूलन कार्यक्रम…

कृपासिंधू दुग्ध उत्पादक संस्था आणि पशुसंवर्धन विभागाचे आयोजन; दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला लाभ..

सावंतवाडी

कृपासिंधू दुग्ध उत्पादक सहकारी संस्था न्हावेली आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पशुधनातील वंध्यत्व निर्मूलनासाठी आवश्यक उपाय आणि घ्यावयाची काळजी यासंदर्भात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना निरवडे येथील पशुधन विकास अधिकारी विद्यानंद देसाई यांच्यामार्फत मार्गदर्शन देण्यात आले.

न्हावेली विडीखारखाना येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरवात गो पुजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष शरद धाऊसकर, पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी विद्यानंद देसाई, डॉ. मंगेश वालावकर,डाॅ.लालाजी गावडे, जेष्ठ शेतकरी जयदेव धाऊसकर,पशुधन परिचर भानुदास धुरी,लक्ष्मण परब आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पशुधन विकास अधिकारी श्री देसाई म्हणाले, शासनामार्फत राज्यव्यापी वंदत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.पशु उत्पादकता वाढ तसेच पशुधनामध्ये येणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे मुळात थंडीच्या काळात जनावरे माजावर येण्याची प्रक्रिया जास्त असते या काळात जनावरावर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांची काळजी घेणे गरजेचे असते सद्यस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे फॅट न लागणे दुधाचे प्रमाण कमी होणे अशा समस्या भेडसावतात यामध्ये वातावरणातील बदल जनावरांच्या चाऱ्या पाण्यातील फरक तसेच अन्य काही गोष्टी कारणीभूत आहेत त्यासाठी चारापाणी तसेच इतर गोष्टींमध्ये कायम लक्ष असणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा जनावरांना मिनरल मिश्रण ची मात्र गुणकारी ठरते.
त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जनावरांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत माहिती करून घेतली उपस्थित शेतकऱ्यांना जंतनाशक औषध गोचीड औषध त्याचे मोफत वाटपही यावेळी करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांची मोफत तपासणी, लसीकरण अन्य सुविधाही या ठिकाणी देण्यात आली.
कृपासिंधू दुग्ध सहकारी संस्थेने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने विविध उपक्रम नेहमीच हाती घेतले आहेत. वंधत्व निर्मूलन अभियानांतर्गत घेतलेला झालेला हा उपक्रम शेतकर्यांना निश्चितच फायदेशीर ठरेल असा विश्वास यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री धाऊसकर यांनी व्यक्त केला.भविष्यात संस्था शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विठोबा गावडे,अर्जुन परब, वैभव धाऊसकर,चंद्रकांत पार्सेकर, सुधीर माळकर, सिताराम पालेकर, अनिल धाऊसकर, दशरथ साळगावकर,जयेंद्र साळगावकर, भानुदास धुरी,भगवान धाऊसकर, संतोष निर्गुण, अजित धाऊसकर, विजय नाईक, विलास पोपकर,
सानिया हरमलकर,रूपाली परब,ज्ञानेश्वर हिराप,बाबुराव शिरोडकर,नाना केरकर आधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा