You are currently viewing उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन अमरावती येथे 24 डिसेंबर रोजी संपन्न होणार

उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन अमरावती येथे 24 डिसेंबर रोजी संपन्न होणार

*उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन अमरावती येथे 24 डिसेंबर रोजी संपन्न होणार*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठीचे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन भारतरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्त मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती येथे 24 डिसेंबर 2023 वार रविवारला आयोजित करण्यात आलेले आहे या संमेलनाचे अध्यक्ष तथा फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. सतीश तराळ संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ. स्मिताताई देशमुख या संमेलनाचे उद्घाटक तथा अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती मा. श्री हर्षवर्धन देशमुख या संमेलनाचे संयोजक तथा या महाविद्या लयाच्या मराठी विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ. मंदाताई नांदुरकर संमेलनाचे निमंत्रक तथा सचिव विवेकानंद वाचनालय, अमरावती डॉ. मंगेश निर्मळ या संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा अध्यक्ष युवा संसद संस्था, अमरावती मा. श्री नितीन पवित्रकार संमेलनाचे सहकार्याध्यक्ष तथा फाउंडेशनचे राज्य संघटक मा. प्रा. आनंद महाजन संमेलनाचे सह निमंत्रक तथा फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक मा. श्री गजानन इटणारे तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य कार्यकारिणीचे सन्माननीय पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन संपन्न होत आहे असे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे. उज्जैनकर फाउंडेशनचे मुक्ताईनगर ,गोवा, पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, खामगाव जिल्हा बुलढाणा आदी ठिकाणी विविध संमेलनाचे यशस्वी आयोजन झालेले आहे. उज्जैनकर फाउंडेशन तर्फे राज्यामध्ये व राज्या बाहेर सुद्धा मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी राज्यस्तरीय आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वर्षातून दोन संमेलनाचे आयोजन केले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा