– निलेश राणेंची मागणी
सिंधुदुर्ग
राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड जाहीर केलाय. हा नियम कर्मचाऱ्यां बरोबरच मंत्री आणि आमदारांना पण लागू करण्याची मागणी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
राज्य शासनाने शुक्रवारी अध्यादेश काढून शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स, टी शर्ट, स्लीपर घालून येण्यास मनाई केली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी हा निर्णय मंत्री आणि आमदारांना पण लागू करण्याची मागणी ट्विटरवर केली आहे. एका वृत्तपत्राच्या बातमीचा आधार घेत “मग हाच नियम मंत्री व आमदारांपण लागू करा. आदित्य ठाकरे (प्रदूषण मंत्री) रोहित पवार (स्वयम् घोषित नेता) आदी टीशर्ट, जीन्स घालून मंत्रालयात उनाडक्या करत असतात. मंत्री, आमदार पण शासनाचा एक प्रकारे कर्मचारीच” असं ट्विट करत मंत्री आणि आमदारांना पण ड्रेस कोड लागू करावा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.