*प्रशिक्षणासाठी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक मंडळ यांची उपस्थिती*
सिंधुनगरी :
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ दि को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे यांच्यामार्फत दि.१२ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सुधारित बँकिंग रेग्युलेशन अँक्ट २०२० व सायबर सिक्युरिटी संदर्भात बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम जयपुर,राजस्थान येथे आयोजित करण्यात आला होता. सदर प्रशिक्षणासाठी बँकेचे मा.अध्यक्ष श्री.मनिष दळवी उपाध्यक्ष मा.श्री अतुल काळसेकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रमोद गावडे तसेच अन्य संचालक व वरिष्ठ अधिकारी म्हणून २२जणांनी सहभाग घेतला. नाबार्डचा राजस्थान प्रादेशिक कार्यालयामार्फत सरव्यवस्थापक श्री.पांडे तसेच वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉ-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे, मार्फत डॉ.वाय एस पाटील यांनी प्रशिक्षण दिले. तसेच राजस्थान राज्य बँकेसही भेट देऊन त्या राज्यातील जिल्हा बँक व सहकारी संस्थांच्या बँकेची माहिती जाणून घेतली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती मा.अध्यक्ष महोदय यांनी दिली आपल्या बँकेच्या कामकाजाबाबत राजस्थान राज्य बँकेचे सरव्यवस्थापक श्री.अनिल मेॆथल यांनी समाधान व्यक्त केले.