You are currently viewing सावंतवाडीत 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी…

सावंतवाडीत 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी…

सावंतवाडीत 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत 20 डिसेंबर बुधवारी वटसावित्री सभागृह खासकीलवाडा येथे संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी सकाळी 7 वा. संत गाडगेबाबा भाजी मंडईची साफसफाई करणे, व नंतर प्रत्येकाने आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर साफ करावा हीच खऱ्या अर्थाने गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी केल्यासारखी होईल. नंतर 9:30 वा. गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन, आरती-प्रसादवाटप,11 वा. परिट समाज बांधव भगिनींची बैठक नंतर कीर्तन, दुपारी 1:30 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. कुटीर रुग्णालय व राणी जानकीबाई सुतीकागृह येथे फळे व प्रसाद वाटप, सायंकाळी भजन व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. तरी या पुण्यतिथीला जिल्ह्यातील परिट बंधू भगिनींनी व गाडगेबाबांच्या भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर मो.बा. 9422586114, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर,शहराध्यक्ष दयानंद रेडकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा