*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग ८*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण आता *आपस्तम्ब स्मृतिबद्दल* या आठव्या भागात पहाणार आहोत .
८)आपस्तम्ब स्मृति—
आपस्तम्ब ऋषिंनी लिहिलेली ही स्मृति म्हणून आपस्तम्ब स्मृति हे नाव आहे . या स्मृतित एकूण दह अध्याय आहेत . पहिल्या अध्यायात ३४ , दुसर्या अध्यायात १४ , तिसर्या अध्यायात १२ , चवथ्या अध्यायात ११ , पाचव्या अध्यायात १४ , सहाव्या अध्यायात १० , सातव्या अध्यायात २२ , आठव्या अध्यायात २१ , नवव्या अध्यायात ४४ आणि दहाव्या अध्यायात १६ , असे एकूण २१४ श्लोकांची ही संहिता आहे .
यात गोरोधनादि विषय , गोहत्या , शुद्धि , अशुद्धि , वस्त्रधारण , रजस्वला , विवाह , कन्या रजोदर्शन , सुरादि सेवन , दूषित अन्न भोजन , मोक्षादिकारणाभिधान आदि विषय येतात . शिवाय याआगोदर जे केशवपनाबद्दल विधान आले आहे , तसेच या ही ऋषिंनी नारीचे मुण्डन न करण्याबाबत विधान केले आहे . आता काही मला भावलेले श्लोक देत आहे , जे या स्मृतिचि उंची वाढवणारेच आहेत , हे निःसंशय .
*न दुष्येत् सन्तता धारा वातोद्धूताश्च रेणवः ।*
*स्त्रियो वृद्धाश्च बालाश्च न दुष्यन्ति कदाचन ॥*
निरंतर वाहणारी पाण्याची धार , वायुने उडणारी धूळ , स्रिया , वृद्ध आणि बालक कधीच अपवित्र नसतात .
सोवळ्याचे नावाखाली असमज लहान मुलांना आमचेकडे दंडित केले गेले बर्याचदा ! हा शुद्धतेच्या विचाराचा अतिरेक होता ? विद्वानांनी कृपया सांगावे .
*आत्मशय्या च वस्त्रञ्च जायापत्यं कमण्डलुः।*
*आत्मनः शुचिरेतानि परेषामशुचीनि तु ।*
आपली शय्या , वस्त्र , पत्नि , सन्तान आणि जलपात्र या वस्तु आपल्याच शुद्ध असतात , दुसर्याच्या अशुद्ध असतात .
आज कोरोनाचे थैमान आहे . जिथे बाहेर जावून आलेला आपलाच अशुद्ध असतो ! तिथे दुसर्याची कथा योग्यच वर्णित आहे ना श्लोकातली ! जास्त स्पष्टीकरणाची कोरोनामुळे गरज भासली नाही , म्हणून कोरोनाचे आभारच !😂😂 अन्यथा भारतात शंकासुरांची फौज कमी नाहीच !! दुसर्याच्या पत्नीवर वाईट नजर असू नये व स्वतःचा मुलगा असतांना काहींना दुसर्याच्या मुलांना काम सांगण्याची सवय असते ! ही बर्याच जणांची तक्रार सारखीच असेल ना ! मग ऋषिंच्या दूरदृष्टीला नमस्कार करणार ना ?
*वापीकूपतडागानां दूषितानाञ्च शोधनम् ।*
*कुम्भानां शतमुद्धृत्य पञ्चगव्यं ततः क्षिपेत् ॥*
दूषित झालेली विहीर , आड , तलाव यांचे शुद्धीकरण त्यातून शंभर घडे ( अदमासे दहाहजार लीटरपेक्षा जास्त , कारण घडे त्या काळातील मापाचे! आजच्या नाही ! ) पाणी काढून टाकावे व तत्पश्चात् पंचगव्य ( गाईचे दूध , दही , तूप , गोमय व गोमूत्र ) टाकावे .
पंचगव्याचे जर शुद्धीकरणात येवढे स्थान असेल तर गोहत्या का करावी ? याचे उत्तर भारतातील संस्कृतीविरोधात भाष्य करणारे शास्त्रज्ञ , साहित्तिक , राजकारणी वा इतर धर्मीय देवू शकतील ?? ज्या राजकारण्यांनी भारतीयांची मातृभाषा संस्कृत व या देशाचे आयुर्वेद वैद्यक शास्त्र याबाबत दुर्लक्ष केले !!!!!
*शूद्रान्नं शूद्रसम्पर्कः शूद्रेणैव सहासनम् ।*
*शूद्रात्ज्ञानागमः कञ्चिज्ज्वलन्तमपि पातयेत् ।*
शूद्राचे अन्न , शूद्राचा सम्पर्क , शूद्रासह एक आसनावर बसणे आणि शूद्राकडून ज्ञानाची प्राप्ति करणे , या गोष्टी जाज्वल्य मनुष्याचे पतन करु शकतात .
हा श्लोक मी मुद्दामच घेतला . राजकारणी लोकांची व्यवस्था , बैठक ( जेवणासंबंधी ) ही नेहेमी वेगळी असते बर्याच कार्यक्रमात ! प्रिन्सिपल शेजारी शिपायाची वा मोठ्या हॉस्पिटलस् चे डॉक्टरांची बैठक व्यवस्था वाॅर्डबाॅयसह असू शकेल ? ते शिकतील तत्वज्ञान शिपाई वा वाॅर्डबाॅयकडून ? ही साधी उदाहरणे आज आहेत तर त्या काळातला जाज्वल्यमान मनुष्य कसा असेल ? प्रत्येकाचे वागण्याचे , बोलण्याचे , अन्नसेवनाचे नियम असतात . ते ओलांडले तर समाजही किंमत आजसुद्धा ठेवत नाही ! तो काळ किती कठीण होता ? समजून घ्या . आजही एकाच समाजातील माणसे आपल्याच समाजातील प्रत्येकाकडे जेवतातच , असे अजिबात नाही ! हे ही लक्षात घ्या . अशुद्धता , अस्वच्छता आणि उच्चनीचतेची मानसिकता हीच कारणे !!!!!
*शूद्रान्नेन तु भुक्तेन मैथुनं योSधिगच्छति ।*
*यस्यान्नं तस्य ते पुत्रा ह्यन्नाच्छुक्रस्य सम्भवः ॥*
शूद्राचे अन्न खावून जो मनुष्य सन्तानोत्पत्तीकरिता मैथुन करतो , ते पुत्र ज्याचे अन्न खातो त्याचेच असतात . कारण अन्नानेच वीर्याची उत्पत्ती होते .
या समग्र भारत वर्षात ब्रम्हर्षि पदाला पोहोचणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे दशरथास आज्ञा देण्याची शक्ति ठेवणारे वशिष्ठ शूद्र होते व राम लक्ष्मणास शिकवणारे दुसरे व्यक्तिमत्व विश्वामित्र क्षत्रिय होते . मुळात ज्या संस्कृतीत शूद्रासही ब्रह्मर्षि होण्याचा अधिकार आहे , त्या संस्कृतिचे ऋषि चुकीचे लिहितील ? तसं असेल तर आजचे आमचे राष्ट्रपती वा त्यांचे विरोधात निवडणूक लढवणारे व्यक्तिमत्व भारतातील प्रत्येक दलिताकडे जेवू शकतील ? मुळात शूद्र हा शब्द अस्वच्छता , अशुद्धता , मानसिक दीनता याशी संबंधीत आहे . कुठलेही कार्य कमी प्रतीचे नसते , तर कुठलेही कर्म करणारा कमी प्रतीचा कसा असू शकतो ? पण आज ही प्रत्येक समाजात असे अशौचतेने राहणारी माणसे असतातच . त्यांचेकडे त्यांच्याच समाजातील माणसे जेवत नाहीत ! ही आजची परिस्थिती , तर तो काळ कसा असेल ? हे पुन्हा सांगणे . तंबाखू खावून त्याच हाताने चहा बनवणारा वा चव घेवून पुन्हा त्याच हाताने वाटणारा वा नास्ता देणारा चांगला असू शकतो ? दुधाची पुडी तोंडाने फोडणारा चांगला असतो ? आणि सर्वात कहर म्हणजे अति उच्च माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत एक ही माणूस चहा प्यायल्यावर वा नास्ता खाल्यावर तोंड धुतोच असे अजिबात नाही ! ( समस्त माता भगिनीवर्गाची क्षमा मागून ) घराबाहेर मूत्रप्रवृतीसाठी जाणारे सगळे उच्चभ्रूंनी ते किती वेळा हातपाय धुतात ? हे स्वमनाला विचारुन पहावे ?? सगळे अशुद्ध !!!! वाह !!!!! मी तर सूट बुटातली , अॉडी वापरणारी व स्वतःला धर्म—अर्थ—भोग आणि अधिकारात उच्चभ्रू ( दुसरा चुकल्यावर ज्यांच्या भुवया रागाने उंचावतात , ते उच्चभ्रू ! ) समजणारी माणसे दुर्गंधाचा घमघमाट असलेल्या मूत्रीघरातही गप्पा मारतांना वा दिलखुलास हसतांना मी पाहिली आहेत आणि शिंतोडे ऋषिंच्या स्मृतिंवर ! ही आमची चूक नाही वाटत ? या श्लोकात वीर्याबद्दल आणि होणार्या पुत्राबद्दल विधान आहे . आयुर्वेद शिका वा काही सिद्धांत तर आयुष्यात पाठ करा !!! ” अन्नं वृत्तिकराणां श्रेष्ठम् ” हे मी आगोदरच सांगितले आहे ! समाजव्यवस्था , धर्मव्यवस्था , वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था आयुष्य खपवून तयार करणार्या माझ्या ऋषिंवर शिंतोडे उडवणार्यांसाठी भरपूर प्रश्नच आहेत !!! त्यांनी द्यावी उत्तरे ! अन्यथा ऋषिप्रणित समाजरचना मान्य करावी . असो . मला वाद नको . ऋषिविचार सर्वांपर्यंत पोहोचावा . ( जी समाजरचना कदाचित तथाकथित राजकारणी लोकांकडून समाजासमाजात भेद पाडण्यासाठी व केवल ब्राह्मणांना वाईठ ठरवण्यासाठी आणिस्वतःचे वर्चस्वासाठी लक्ष केली गेलेली असेल !!!)
*विवाहोत्सवयज्ञेषु अन्तरा मृतसूतके ।*
*सद्यः शुद्धिं विजानीयात् पूर्वं सङ्कल्पितं चरेत् ॥*
विवाह , उत्सव , यज्ञ इ. सुरु असतांना मधेच मृतसूतक वा जन्मसूतक ( वृद्धिसूतक ) आले तर त्या अशौचाची ताबडतोब शुद्धिप्रक्रिया करुन पहिले केलेल्या संकल्पास पूर्ण करावे .
तूर्तास याचेसारखा सुंदर श्लोक मला तरी वाटत नाही ! या श्लोकाने सर्व समाजातील समस्या सुटाव्यात !! असाच श्लोक आहे , सर्वांगसुंदर धर्मनिर्णय अत्यंत अडचणीचे वेळेचा ! यासाठी आपस्तंबांना , त्यांच्या सुदूरदृष्टीला सविनय , सादर , साष्टांग प्रणिपातच !!🙏🙏
आज एवढे पुरेसे वाटते . उद्या पुढील स्मृति पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹