You are currently viewing आत्महत्या- ४

आत्महत्या- ४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*आत्महत्या- ४*

 

मध्यंतरीचे कालखंडात म्हणजे २०१३चे आगोदर भारतीय कोर्ट निर्णय घेणार होते ( तो घेतला गेला का नाही ! हे मला माहित नाही !! ) एका विषयावर . तो विषय *” लग्न झालेल्या स्त्रीने सुद्धा स्वतःचे इच्छेने पर पुरुषाशी संबंध ठेवायला हरकत नाही “* हा किंवा अशा आशयाशी मिळताजुळता असावा !! मी यावर विचार करतांना प्रथम प्रश्न पडतो की *” हा विषय माझ्या देशात दैवी संस्कृती नांदवणारा आहे का आसुरी संस्कृती नांदवणारा आहे ? “* *माझ्या देशातील समग्र स्त्रीवर्गास घृणास्पद कृत्य शिकवणारा आहे की नाही ? आणि ज्या देशाची न्यायव्यवस्थाच आसुरी निर्णयाची अम्मलबजावणी करत असतील व जनता विरोध करत नसेल तर ते *मेलेल्या मनांचे राष्ट्र नाही का ?*

सांदिपनी ऋषिंचे आश्रमात श्रीकृष्ण व विश्वामित्राचे आश्रमात राम—लक्ष्मण तयार झाले . विश्वामित्रांनी तर हे दोनच विद्यार्थी घडवले पण जगज्जेतेच !! वाल्मिकींचे आश्रमाचे वर्णन ऐकले की असे कळते ” ज्या वेळेस लव आणि कुशाने त्यांचे आश्रमात शिक्षणासाठी प्रवेश केला त्या वेळेस एकेक करुन बहुतेक विद्यार्थ्यांनी आश्रम सोडून दुसर्‍या आश्रमात प्रवेश घेतला , एवढी बुद्धिमत्ता व शिकण्याची जिद्द व प्रवृत्ती पण होती त्यांची ! ” ही आमची उज्वल , प्रसन्न शिक्षणपद्धती होती आणि आज आम्ही आमच्या आजच्या शिक्षण पद्धतीत *मेलेल्या गुलाम मनांची निर्मिती करत आहोत* . निर्लज्य राज्यकर्ते ज्या देशावर राज्यकारभार पहात असतील , त्या देशातील माणसे आत्महत्या नाही करणार तर काय करणार ?? जबाबदार *राजाच* असतो , हे प्रथम सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे .

माझ्या लहानपणी निदान एक हप्ता तरी भाजीपाला फ्रीजशिवाय व्यवस्थित रहात होता . आता एक दिवसही तो रहात नाही !!!!!! याला जबाबदार शेतकरी का शेतकर्‍याला कर्जात बुडवणारे सरकार व शेतात फवारायला विषाची निर्मिती करुन ते स्कीममधे देणारे सरकार !!!!???????

*आत्महत्या* हा प्रश्न गहनच आहे . पण *राजा कालस्य कारणम्* यावरुन सर्व परिस्थितीला राजाच जबाबदार असतो व त्याचे देश—देव—धर्म ( याचा अर्थ संकुचित घेवू नका , जे तुमचं कर्म तोच धर्म ! ) विरोधी मूर्ख निर्णयास साथ देणारी जनता असते .

न्यायसंस्था , शिक्षण संस्था , विवाह संस्था , आर्थिक व्यवहार संस्था , संरक्षण यंत्रणा या व इतर अन्य संस्था तसेच व्यवस्था ज्या देशात बिघडल्या असतील त्या देशात मेलेली मने जगत असणार नाहीतर काय !!!! मग त्यांनी आत्महत्या केली काय आणि नाही केली काय ! सारखेच !!! हेच झाले सत्तर वर्षात !!!! आणि मेलेल्या मनाची माणसे पुन्हा *आमचा नेता* म्हणून आपल्याच राजकारण्यांच्या खेळाला कवटाळत बसतात !!! आमच्यासारख्याला लाज तर वाटते असल्या माणसांमधे जगण्याची , पण करणार काय ? जीव आहे तोपर्यंत जगणे आहेच !! ओजस्वी , तेजस्वी , जाज्वल्य , अस्मितायुक्त देशप्रेमी आणि उज्वल इतिसाची साक्ष जपणारी मनं तयार व्हावीत का नाही आपल्या देशात ??? तर आत्महत्या थांबतीलच ! वा थांबायला हव्यात ! माझा देशबांधव व्यथित मनाने मरताच कामा नये , ही सकारात्मक इच्छा ठेवून हे केलेले लिखाण . असो . बाकी पुढील लेखनात .

इत्यलम् ।

🙏🙏 🙏🙏

©लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

 

 

*संवाद मिडिया*

 

*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*

 

*Advt Link👇*

————————————————-

*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇

 

🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️

 

👉 *रेरा क्रमांक – P52900053094*

 

👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇

 

👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️

 

👉 डांबरी रस्ते🛣️

 

👉 आकर्षक इलेव्हेशन

 

👉 निसर्गरम्य परिसर🏡

 

👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️

 

👉 आजच बुक करा.. 📝

 

*👉संपर्क करा..!!📱*

 

*बिल्डर्स श्री. संजय सावंत*

9422381608 / 7276300298 / 8411066704

 

🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =