मालवण :
पळसंब गावचे माजी सरपंच तथा उबाठा शिवसेना गटाचे आचरा विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि जेष्ठ नेते किरण सामंत यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून रत्नागिरी येथे किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
चंद्रकांत गोलतकर यांच्या प्रवेशामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या समवेत उबाठा गटाचे कार्यकर्ते भरत किरूळकर यांनी ही जाहीर प्रवेश केला. गावाच्या आणि परिसरातील गावाचा विकासासाठी प्रवेश करत असल्याचे चंद्रकांत गोलतकर म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकनिष्ठ पदाधिकारी आपण राहिलो. पक्ष वाढवण्यासाठी खूप कष्ट केले, मात्र विकासासाठी मागे राहिलो. त्यामुळे आज प्रवेश करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपण मालवणात जोरदार धक्का दिला असून मालवण तालुक्यात मोठा राजकीय भूकंप करणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले. या प्रवेशा दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेखर राणे,तालुका प्रमुख महेश राणे, सतीश आचरेकर, युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद, अजु भोंगले उपस्थित होते.