आज माका ते दिवस,
पुन्हा आठवचे हत…
तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण
माझ्या डोळ्यात साठवचे हत,
उभे र्हववले ते सगळे प्रश्न
एकदाच सोडवचे हत,
तुझ्या माझ्यात असलेले वाद
कायमचे मिटवचे हत,
आज माका ते दिवस,
पुन्हा आठवचे हत….
तू लिहिलेल्या पत्रातले
ते तुझेच मजकूर माका
तुकाच पाठवचे हत,
ते वाचताना उमटलेले
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव
माझ्या मनात दडवचे हत,
आज माका ते दिवस,
पुन्हा आठवचे हत….
तू दाखयलेली सोनेरी स्वप्ना,
दिवसाढवळ्या मी जगलेली
एकदा तुकाच दाखवची हत,
तुझ्यासोबत जगता जगता
त्या स्वप्नांका सैर करुक
पापण्यार बसवचे हत,
आज माका ते दिवस
पुन्हा आठवचे हत….
तुझ्या ओठांनी पीलेल्या
माझ्या गालावरच्या अश्रूंका,
पुन्हा एकदा डोळ्यातून
गालावर सांडवचे हत,
त्या सांडणाऱ्या आसवांका
मोती बनवून चमकवूचे हत,
आज माका ते दिवस,
पुन्हा आठवचे हत….!!
(दिपी)✒
८४४६७४३१९६