You are currently viewing निवृत्त कर्मचाऱ्यानी हक्कासाठी सतर्क व जागृत रहावे:दादा कुडतरकर

निवृत्त कर्मचाऱ्यानी हक्कासाठी सतर्क व जागृत रहावे:दादा कुडतरकर

निवृत्त कर्मचाऱ्यानी हक्कासाठी सतर्क व जागृत रहावे : दादा कुडतरकर

कणकवली

शासकीय कर्मचारी आपल्या आयुष्याचा तीन -चतुर्थांश काळ शासकीय सेवेसाठी देतो परंतु वृद्धापकाळी त्याला पेन्शन न मिळाल्यास त्याला निवृत्तीनंतरचे आयुष्य हलाखीचे काढावे लागेल. यासाठी सध्या सेवेत असलेले व निवृत्त झालेल्या सर्वांनी आपल्या हक्कासाठी सतर्क व जागृत राहिले पाहिजे असे परखड विचार कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी मांडले .

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली कलमठ येथील पेन्शनर्स भवनमध्ये पार पडली सभेत प्रथमतः असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व कार्यकारणीचे सल्लागार दिवंगत कै. प्रा.पी.बी. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली. 17 डिसेंबर 2023 चा पेन्शनर्स डे आजच्या सभेच्या दिवशी पेन्शनर डे चे निमित्ताने उपस्थित कार्यकारणी पेन्शनर्स सदस्य व सभासद यांच्याकडून शासनाकडून मिळत असलेल्या पेन्शनबाबत संवाद व चर्चा करण्यात आली. असोसिएशनचे सदस्य सुरेश पाटकर यांनी शासनाच्या जुन्या पेन्शनच्या धोरणाबाबत आपले विचार मांडले तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विविध संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला.पेन्शनर डे चे औचित्य साधून ज्येष्ठ पेन्शनर व कार्यकारणी सदस्य अशोक रामचंद्र राणे यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी संघटनेसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.पेन्शनर डे साजरा करणे संदर्भात चर्चा करण्यात करताना अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी सांगितले की ,सर्वोच्च न्यायालयात 17 डिसेंबर 1982 साली न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने पेन्शन ही भीक नसून ती पेन्शनर्सनी त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला असून तो पेन्शनरचा हक्क आहे असा निर्णय दिला,तो दिवस म्हणजे 17 डिसेंबर 1982 आणि म्हणून 17 डिसेंबर हा दिवस पेन्शनर डे म्हणून आपण साजरा करीत आहोत . सभेत सन 2024 चे पेन्शनर दिनदर्शिका छपाई बाबत चर्चा होऊन आढावा झाला सदर सभेस कार्यकारणीचे उपाध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव व्ही. के .चव्हाण, सदस्य सखाराम सपकाळ , अशोक राणे,सिद्धार्थ तांबे,महेंद्र कुमार मुरकर व श्रीमती देवरुखकर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा