You are currently viewing जल जीवन मिशन चे नवीन काम देताना ठेकेदाराने पहिल्या कामाची काय पूर्तता केली ती तपासा

जल जीवन मिशन चे नवीन काम देताना ठेकेदाराने पहिल्या कामाची काय पूर्तता केली ती तपासा

जल जीवन मिशन चे नवीन काम देताना ठेकेदाराने पहिल्या कामाची काय पूर्तता केली ती तपासा

*दहा आणि पंधरा कामे एक एका ठेकदारांकडे;कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नियंत्रण हवे

*आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली भूमिका

* जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली दखल,अपूर्ण कामे ठेवणाऱ्यांवर येणार निर्बंध

* विधानसभेत अपूर्ण कामे ठेकदार ठेवत असल्याची झाली चर्चा

(नागपूर विधान भवन)
जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत गावोगावी पाणी पुरवठ्याची कामे सुरू आहेत मात्र दहा आणि पंधरा कामे एक एक ठेकेदार घेतात.त्यामुळे सर्वच कामे अपूर्ण राहत असल्याचे पहायला मिळते.अशा ठेकेदारांना नवीन काम देताना पूर्वीच्या कामाची काय प्रगती केली आहे. ती तपासून पाहिली जावी आणि नंतरच नवीन काम दिले जावे व पूर्वीच्या कामाचे पेमेंट अदा करावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली.
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत एक एक ठेकदर १५-१५ कामे घेतो. मात्र पंधरावे काम घेत असताना त्याने पहिले घेतलेले काम पूर्ण झाले आहे काय याची शहानिशा केली जात नाही. ठेकेदार एका मागून एक कामे घेत राहतात आणि कामे अर्धवट पडलेली असतात त्यामुळे जनतेमध्ये जल जीवन मिशन सारख्या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन योजना आणल्यानंतर जनतेत आनंद व्यक्त केला गेला. पाणी मिळेल अशी आशा प्रत्येक मनाला निर्माण झाली आहे.मात्र कानेक कामे स्वतः कडे घेवून ठेवण्याच्या ठेकेदारांच्या या प्रवृत्तीमुळे कामे प्रलंबित राहत आहेत.लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही गावात जातो त्यावेळी तिथली अवस्था लोक आम्हाला दाखवतात आणि चिंता ही व्यक्त करतात. त्यामुळे ठेकेदारांना किती कामे द्यावी आणि त्यांच्यापासून ती कामे कशा पद्धतीने पूर्ण करून घ्यावी यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
दरम्यान यावेळी जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या सूचनांचा आदर करून योग्य ती कारवाई केली जाईल. जल जीवन मिशन साठी काम करणारे रजिस्टर ठेकेदार मर्यादित असल्यामुळे काही वेळा एकाच ठेकेदाराला अधिक कामे द्यावी लागतात मात्र तसे करताना त्यांनी घेतलेली पहिली कामे किंवा टप्प्याटप्प्याने घेतलेली कामे पूर्ण झाली आहेत का हे पाहूनच प्रक्रिया करू असे आश्वासन दिले.
बॉक्स
मंत्री गुलाबराव पाटील हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे फायटर शिवसैनिक

जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे फायटर शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते प्रत्येक योजना योग्य पद्धतीने राबवित आहेत.आणि मोदी साहेबांची ही जल जीवन मिशन योजना यशस्वी पद्धतीने राबवतील असा विश्वास सुद्धा यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा