You are currently viewing जानवली अपघातातील पळुन गेलेल्या कार चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात…

जानवली अपघातातील पळुन गेलेल्या कार चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात…

जानवली अपघातातील पळुन गेलेल्या कार चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात…

कणकवली

जानवली रतांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून त्यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार शिरगाव चेकपोस्टवर देवगड पोलिसांना सापडली. अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुवाळी (रा. जामसंडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानवली येथे काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारने अंजली साळवी यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला घटनेची माहिती देत अज्ञात कारबाबत सूचना केली होती. जानवली येथे अपघात घडल्यानंतर सदर अपघातग्रस्त कारसह चालकाने घटनस्थळावरून धूम ठोकली होती. शिरगाव चेकपोस्टवर सदर इनोव्हा कार आली असती ऑन ड्युटी एएसआय डगरे याना इनोव्हाच्या दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने संशय आला. डगरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता चालक धुवाळी याने चिरे भरलेल्या ट्रक ने इनोव्हा ला ठोकल्याची विसंगत माहिती दिली. ए एस आय डगरे याना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक बगळे याना कल्पना दिली असता त्यांना सदर कार जानवली येथील अपघातात असल्याची शंका आली. त्यानुसार चालक अवधूत धुवाळी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने जानवली येथे दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री कारचालकासह कार कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सदर इनोव्हा कार जामसंडे येथील रुमडे यांच्या मालकीची असून दुरुस्तीसाठी कणकवली येथे सोडण्यात आली होती. दुरुस्ती नंतर कार जामसंडे येथे नेत असताना हा अपघात घडला.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा