You are currently viewing स्मृति भाग ६

स्मृति भाग ६

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग ६*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज संवर्त स्मृतिचा विचार करु . संवर्त नावाच्या ऋषिंनी ही स्मृति लिहिली , म्हणून संवर्त स्मृति .

६)संवर्त स्मृति— एकूण दोनशे तेहतीस श्लोक ह्या स्मृतित समाविष्ट आहेत .
यात ब्रह्मचर्य वर्णन , धर्म वर्णन , कन्या विवाह वर्णन , अशौच वर्णन , पाप प्रायश्चित्त , गोदान महात्म्य , दिनचर्या वर्णन , वानप्रस्थ , यतिधर्म , सुरापान , जीवहत्या , अगम्यागमन , अभक्ष्य—भक्ष्य , प्रायश्चित्त , उपवास व्रत , ब्राह्मण भोजन , गायत्री प्राणायामादि विषय येतात . यात मला आवडलेला एक श्लोक पुढे देत आहे .

*यज्ञोSनृतेन क्षरति तपः क्षरति विस्मयात् ।*
*आयुर्विप्रापवादेन दानं च परिकीर्तनात् ॥९७॥*
याचा अर्थ , यज्ञ हा खोटे बोलण्याने क्षीण होतो , अभिमानाने तप क्षीण होते , ब्राह्मणाचे निन्देने आयुष्य क्षीण होते आणि दान —त्या दानाचे वर्णनाने क्षीण होते .
हा सुभाषित वजा श्लोक संवर्त ऋषिंचे मानसिक सौंदर्य घेवून जन्माला आल्यासारखा वाटतो . सदर श्लोकावर कुणालाही आडवे तिडवे प्रश्न सुचू शकतात !! ?? विज्ञानवादी तर ” कसे क्षीण होते दाखवा ! ” म्हणून तयारच असतात या लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्य उर्फ स्वैराचाराचा फायदा उठवण्यासाठी !! या आगोदरही अनेक प्रश्न विचारले गेले ! आणि येथील खरी वैचारिक वाणी शांतच राहिली . असो.
यज्ञ खोटे बोलण्याने क्षीण होतो ? यज्ञ म्हणजे आमच्या नजरेत चार विटा ठेवून , अग्नि पेटवून त्यात समिधा जाळणे , एवढेच ? नाही . आपण जेवण करतो तेव्हा काय म्हणतो , ” उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ” . जेवण हे यज्ञकर्म आहे ? आणि जर तसं असेल तर नशीब व कर्तृत्वाने वाट्याला आलेले प्रत्येक काम हे यज्ञकर्मच असते! फक्त त्यात ” सद्गुण ” पेरले तर योग आणि दुर्गुण पेरले तर ” भोग ” ! असेच ना ? पण अजून थोडा विचार केला की ” देव ” पेरला तर जीवन दैवी होतं आणि ” अहंकार ” पेरला तर जीवन राक्षसी होतं . यात ” देव ” पेरणं म्हणजे फलिताचं श्रेय दुसर्‍याला देणं , असं मी समजतो . तर अगदी शिपायाचे काम ही यज्ञच होतो . मग असा यज्ञ खोटे बोलण्याने क्षीण नाही होणार ? विचार करा . तप अहंकाराने क्षीण होते ! हे सोपं वाटतं ना ! आनंदाने उचललेले काम अखंडित बारा वर्ष करणं म्हणजे तप . मग तर चोरसुध्दा तपी समजायचे का बारा वर्ष सतत चोरीचे काम करणारे ? हो ना ! पण त्यांचा ही वृथाभिमान त्यांना कारावासाचे फलित देण्यास जर समर्थ असेल तर दैवी तप करणाराने अभिमान का बाळगावा ? साधं आणि सरळ रहावं की !!!! पुढची ओळ खरंच भ्रमात टाकणारी आहे ना ? ब्राह्मणाची निन्दा करण्याने आयु क्षीण होते! ऋषि , संत , गुरु यांचे खालोखाल किंबहुना बरोबरीचेच स्थान ब्राह्मणाचे असते . ब्राह्मणाला ” भूदेव ” म्हटले जाते . पण ” दैवीगुणसंपत्ती ” त्याचा स्वभाव असेल तरच तो भूदेव ! जो आपली दिव्य , भव्य , तेजस्वी , ओजस्वी संस्कृति Man to Man , Mouth to Mouth , Mind to Mind , Head to Head , Hut to Hut & Heart to Heart घेवून जातो तो *ब्राह्मण* ” पण असे जरि असले तरी आज कर्म करणार्‍या ब्राह्मणांना नाकारुन चालणार नाही व ” आपण खूप काही करतो ! ” असे त्यांनीही समजून चालणार नाही ! दुसरी बाजू ही की ” परनिन्दा ” हा स्वभाव वा गुण म्हणून योग्य आहे का ? तो जर अयोग्य असेल तर संवर्त ऋषिंनी योग्यच सांगितले !! होय ना !! आणि चवथा चरण येतो , दानाचे वर्णनाने दान क्षीण होते ! हे तर खरंच आहे ! आपण केलेले सत्कर्म , ते ही दानासारखे ! दवंडीच पिटायची तर दानाची वा कर्माची का पिटावी ? सत्कर्म करणाराचे नाव होतेच की ! आमची संस्कृति सांगते की ” वृद्धं तीर्थे विनिक्षिपेत् ” आपण वापरुन जे जास्त रहात असेल ते तीर्थस्थानी दान दिलं पाहिजे ! दान हा स्वभाव वा रक्तच असलं पाहिजे , हे सांगते आमची संस्कृती . पण आम्हाला समजत नसल्याने आम्ही ते शिकवणार्‍या स्मृतिग्रंथांवर अथवा आमचे दिव्य , भव्य विचारांचे तेजोमय ऋषिंवरच आक्षेप घेतो ना ? माझ्या आजीचे भाचे ” सिद्धेश्वर दादा ” म्हणून आमचेकडे यायचे . वडिल सांगायचे ते योगी आहेत . प्रसूत झालेली वाघीणसुद्धा ते जवळ गेल्यावर त्यांचेपुढे नम्र होते ! हे मी चवथीत ऐकलेलं वाक्य . पण आजीला पक्षवात झालेला असतांना त्यांनी वाघिणीचं दूधच औषध म्हणून पाजण्यासाठी आणल्याचं आज ही आठवतंय मला ! हे जर नजरेसमोरचं आणि घरातलंच उदाहरण असेल तर आमचे ऋषि किती मोठ्या सद्गुणांचे कोष असतील ? कल्पनाच केलेली बरी ! आम्ही आक्षेप घेतांना किती दुर्गुणांना जन्म घालतो ? किती अधःपतीत आहोत आम्ही ? विचार न केलेलाच बरा ! असो . उर्वरीत भाग उद्या .
माझी चूक होत असेल तर कृपया जाणीव द्यावी . आपल्या सर्वांचे आशिर्वादाने माझे लिखाण प्रत्येक भारतीयाचे मनापर्यंत पोहोचावे व माझा देश स्वच्छ मानसिकतेचा व्हावा , ही सदिच्छा .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा