You are currently viewing अबॅकस स्पर्धेत बांद्याच्या एकलव्य अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

अबॅकस स्पर्धेत बांद्याच्या एकलव्य अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

अबॅकस स्पर्धेत बांद्याच्या एकलव्य अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

बांदा

प्रोऍक्टिव्ह अबॅकस कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत बांदा येथील एकलव्य अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील २०२४ विद्यार्थी सहभागी झाले होते. क्लासच्या स्वरा दीपक बांदेकर हीने ४ मिनीटे ५० सेकंदामध्ये अबॅकसच्या सहाय्याने १०० गणिते अचूक सोडवून सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले.

पूर्वी संजय आरोलकर हीने द्वितीय क्रमांक तर ओवी लक्ष्मण नाईक हीने उत्तेजनार्थ पारितोषीक मिळविले. निहारिका निलेश नाटेकर हीने चमकदार कामगिरी करीत गोल्ड मेडल मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अबॅकस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. एकलव्य अबॅकस क्लासच्या संचालिका सौ. स्नेहा संदेश पावसकर यांनाही सलग सात वर्षे अबॅकस मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेस्ट सेंटर परफॉर्मन्स अवॉर्ड्स सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एकलव्य अबॅकस क्लासच्या संचालिका स्नेहा केसरकर – पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

अबॅकसमुळे मुलांची एकाग्रता व आकलन शक्ती यात वाढ होते. तसेच बौद्धिक व व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते. अबॅकस प्रशिक्षणातून हजारो विद्यार्थी घडत आहेत. यामुळे मुले गुणात्मक प्रगती करीत असून अशा विद्यार्थ्यांची नवोदय, स्कॉलरशिप, बीडीएस, एमटीएस, एनटीएस, एसटीएस यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी निवड होत असल्याची माहिती सौ. स्नेहा केसरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा