दोडामार्ग
दोडामार्ग तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच मोठया प्रमाणात कचरा दिसून येत आहे. एकीकडे स्वच्छतेचे संदेश देत फिरावं,आणि बघावं तर चित्र वेगळंच असावं अशी परिस्थिती तेथील आवारातील झाली आहे. या कार्यालयात तालुक्यातील असंख्य नागरिक आपल्या कामासाठी ये जा करत असतात, मात्र कारण नसताना त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
दोडामार्ग तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात स्वच्छतेची नितांत आवश्यकता असतानाही उघड्यावर कचरा टाकला जात आहे. कचऱ्याचे वेळीच संकलन होत नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा त्रास मात्र कामानिमित्त दररोज ये जा करत असणाऱ्या नागरिकांना होत आहे.तात्काळ यावर उपाययोजना व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.