You are currently viewing ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर महाराष्ट्र कोकण भुषण पुरस्काराने सन्मानीत

ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर महाराष्ट्र कोकण भुषण पुरस्काराने सन्मानीत

ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर महाराष्ट्र कोकण भुषण पुरस्काराने सन्मानीत

सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडके यांच्या हस्ते मालवणच्या सुपुत्राचा सन्मान..

सावंतवडी

विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना तळागाळातील बरेच मान्यवर फक्त कार्य करतात . त्यांना कोणत्याही पुरस्काराची आवश्यकता नसते . मानव सेवेचे व्रत जपत असताना समाजात विविध अंगानी काम करणारे व्यक्ती असतात . आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यानुसार सतत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता नि : स्वार्थ वृत्तीने कार्य करीत राहणे म्हणजे जीवनाचा खरा अर्थ असतो . अशाच विचारातून सिंधू सेवा आश्रम , महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा अमूल्य वेळ खर्च करून समाज रचणा्या ध्येयवादी आणि असामान्य व्यक्तींना समाजात वेगळ्या वाटेने चालणाऱ्या कार्याविरांचा सन्मान व्हावा आणि त्यांचे कार्य सह्याद्री प्रमाणे मोठे व्हावे या उद्देशाने पुरस्कार प्रदान करण्यात येतात .

यंदा सन 2023 या वर्षीचा महाराष्ट्र कोकण भुषण पुरस्कार मालवण तालुक्यातील क्रियाशील व कार्यतत्पर युवक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना जाहीर करण्यात आला . महाराष्ट्राच्या विकासात सतत भरीव योगदान देऊन इतिहास रचणा्या या कार्यविराला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. स्वतःच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक व शैक्षिणक क्षेत्रात कार्य करीत असतो . गरजू विद्यार्थ्यांना शैक्षिणक साहित्यासाठी आर्थिक मदत , तरुण व वृध्द व्यक्तींना व्यसन मुक्ती साठी वैयक्तिक पातळीवर जनजागृती मोहीम राबविणे ,आत्मनिर्भर भारत के अंतर्गत युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण , जलजागरण अभियांनामार्फत महाविद्यालयामध्ये पाण्याचे महत्व समजण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन , विविध राष्ट्रीय दिवस महाविद्यालयामध्ये साजरे करून विद्यार्थ्यांना वक्तृत्व , चित्रकला , रांगोळी , निबंध अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, कोरोना काळात विविध प्रकारची सामाजिक कार्ये व वृध्दांसाठी वैयक्तिक पातळीवर मोफत रिक्षा सेवा , चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीमध्ये सहभाग , ग्रामीण भागातील वृध्द व्यक्तींसाठी वैयक्तिक पातळीवर साक्षरता मोहीम व जनजागृती , निराधार व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांना सहकार्य करणे, गड – किल्ले संवर्धनासाठी व्यापक स्तरावर जनजागृती , वृक्ष लागवड व बंधारे बांधण्यात सक्रिय सहभाग , विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग , मोफत आयुष्यमान भारत कार्ड लोकांना काढून देणे , या आधी महत्वाची कागदपत्रे व मोबाईल अशा मिळालेल्या वस्तू दोन्ही व्यक्तीस देऊन प्रामाणिक पणा बद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व मालवण पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या कडून ऐश्वर्य चा सत्कार , बेस्ट एन. सी .सी कँँडेट म्हणून सन्मान , तसेच ग्रामीण रुग्णालय मालवण येथे कोरोना काळात सेवा केल्याबद्दल कोविड योद्धा म्हणून सन्मान , राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल 2021 पुरस्काराने सन्मानित , महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्कार 2022,, एच. एस. सी परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांच्या तर्फे सन्मान , तसेच माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या तर्फे सन्मानपत्र , बी. कॉम परीक्षेत महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्या कडून सन्मानपत्र , एम.कॉम परीक्षेत विशेष प्रविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल मातृत्व आधार या संस्थेकडून सन्मान, उत्कृष्ठ ग्रंथालय वाचक म्हणून सन्मान , केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी कार्यक्रमात प्रगणक म्हणून काम , महाविद्यालयात असताना छात्रसेना प्रमुखही कार्य , ऐश्वर्य वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीचा मालवण तालुका प्रमुख , युवा फोरम मालवण तालुका प्रमुख , नेहरू युवा केंद्र संघटन या भारत सरकारच्या संघटने मध्ये मालवण तालुका समन्वयक पदावर कार्यरत , विधी स्वयंसेवक सिंधुदुर्ग, मानवता विकास परिषद , कोंकण विकास मंच , भंडारी समाज महासंघ , युथ बीट्स फॉर क्लायमेट्स , ग्रूप नवनिर्माण , दक्ष युवक , मातृत्व आधार फाऊंडेशन , दिल्ली फोरम, इकोमेट्स ब्ल्यू विंग, नेचर क्लब, महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ॲक्शन, अशा विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्य करीत आहे . ऐश्वर्य मांजरेकर यांच्या सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल सिंधु सेवा आश्रम महाराष्ट्र या संस्थेने घेतली . सदर पुरस्कार माझा सिंधुदुर्ग संमेलना मध्ये प्रदान करण्यात आला . पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह , सन्मानपत्र ,

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा