*’एमआयटी एडीटी’च्या प्राध्यापकांतर्फे हेल्मेट घालून रस्ता सुरक्षा जनजागृती*
पुणेः
रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि जबाबदार वाहतूक वर्तन प्रस्थापित करण्याच्या एकत्रित प्रयत्नात, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेकनॉलॉजी विद्यापीठाचे प्राध्यापक वृंद, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमे अंतर्गत सोमवारी सकाळी एकत्र आले होते.हेल्मेट घालणे, सीटबेल्ट नियमांचे पालन करणे आणि रहदारीचे नियम पाळणे यासह स्वसुरक्षेसाठी आवश्यक महत्त्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील अश्वारूढी पुतळ्याला पुषार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहयोगी संचालक, प्रा.डॉ. सुराज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात अनेक प्राध्यापक वृंद सहभागी झाले होते. यावेळी बोलताना डॉ. भोयर म्हणाले की, हेल्मेट परिधान करण्याच्या साध्या कृतीमुळे डोक्याला दुखापत होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि अपघातात आपला जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक रायडरने स्वतःच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.
*कोट*
सध्या महामार्गावर रहदारी वाढल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याचे दिसते. बऱ्याच अपघातांमध्ये चालकाने हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे, रस्ता सुरक्षेच्या मुद्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, आणि ज्यात आमच्या विद्यापीठाचा पुढाकार असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
-प्रा.डाॅ.मंगेश कराड,
कुलगुरू तथा कार्याध्यक्ष,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.
*संवाद मीडिया*
*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..
आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
आजच भेट द्या अथवा कॉल करा
*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*