पेटती समई डोक्यावर ठेवून चित्तथरारक समई नृत्याचा आविष्कार
देवगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी गावातील महिला या सर्व शेतकरी मोलमजुरी करणा-या आहेत.
भोळेवाडी शाळेत महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या महिलांचा सहभाग होता.
शाळेच्या शिक्षिका क़ै. सौ. कल्पना बेनके मॅडम यांनी या महिलांना एकत्र करून समई नूत्य शिकवले.
माजी सरपंच संतोष बाणे यांच्या मार्गदर्शनाखाली
पहिला समई नृत्याचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२२ रोजी नवलादेवी मंदिर नाद येथे झाला. आतापर्यंत महिलांनी ७४ प्रयोग केले आहेत.
भांडुप पश्चिमेच्या कोकण नगरातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मैदानावर कोकण महोत्सवाचे मुख्य आयोजक सुजय धुरत व दिलीप हिरनाईक चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली २६व्या कोकण महोत्सवात मुंबई भांडुप मध्ये प्रथमच त्यांना समई नृत्य करण्याची संधी प्राप्त झाली.या कार्यक्रमासाठी
नाद भोळेवाडी ते मुंबई संपूर्ण प्रवास खर्च व आर्थिक मदत भाजपाचे सरचिटणीस संदिप साटम व बंड्या नारकर यांनी केली होती.
भांडुप येथे ७५ वा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . अंगणवाडी सेविका रसिका पाष्टे, मेघा पाष्टे ,प्रगती मटकर, सुलोचना मटकर, करुणा मटकर ,आरती पवार, मयूरीआंग्रे, जयवंती पाष्टे ,भारती गराटे, या महिलांनी समई नृत्यात सहभागी झाल्या होत्या .
समईमध्ये तेलवात घालून ती पेटती समई आपापल्या डोक्यावर ठेवून अलगद चित्तथरारक नृत्य सादर करताना डोक्यावर समई व दोन्ही हातामध्ये निरंजन अशा विविध कसरती करून गाण्याच्या ठेक्यावर गोलाकार नृत्य करुन आपला तोल सावरण्याचे कौशल्य महिलांनी अप्रतिमरित्या दाखविले.
सर्व महिला या ४५ ते ५५ वयोगटातील होत्या.
रसिका पाष्टे या
महिलांना शिकविण्याचे काम करतात.
यापूर्वी देवगड कट्टा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात समई नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, उद्योजक जयवंत नाईक,शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, भांडुप विधानसभा प्रमुख रमेश टक्के ,भाई पेडणेकर, अरुण मेस्त्री ,उमेश खोत आदी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क :*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*